‘बुलडाणा अर्बन’ लावणार रस्त्याच्या दुतर्फा लॉन!
By Admin | Updated: July 13, 2016 02:08 IST2016-07-13T02:08:01+5:302016-07-13T02:08:01+5:30
बुलडाणा शहराचे सौंदर्यीकरण; नागरिकांना मिळणार वॉकिंग ट्रॅकची सुविधा.

‘बुलडाणा अर्बन’ लावणार रस्त्याच्या दुतर्फा लॉन!
बुलडाणा : 'स्वच्छ शहर सुंदर शहर' ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी नेहमीच आगळेवेगळे व लोकोपयोगी आकर्षक आणि आधुनिक प्रकारचे उपक्रम राबविणार्या बुलडाणा अर्बन संस्थेने बुलडाणा शहरात रस्त्याच्या दुतर्फा कमी पाण्यात विकसित होणारी लॉन लावण्याचा निर्णय घेतला असून या कामाला युध्दपातळीवर सुरुवात करण्या त आली आहे. दरम्यान या हिरव्यागार लॉनमुळे शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.
बुलडाणा अर्बन संस्थेने बुलडाणा शहराच्या सौंदर्यीकरणाअंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा कमी पाण्यात वाढणारी लॉन लावण्याचा निर्णय घेतला आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालण्यास सहाय्यभूत ठरणारी ही लॉन कमी पाण्यात वाढते सदर लॉनच्या बिया म्हैसूर विद्यापीठात विकसीत करण्यात आल्या आहेत. सदर बियांची लागवड करण्यासाठी बुलडाणा अर्बन संस्थेने तिस हजार रुपये खर्च करुन स्वबनावटीचे विशिष्ट प्रकारचे कल्टीवेटर यंत्र विकसीत केले आहे. सदर लॉन शहरातील रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आली आहे. कमी पाण्यात विकसीत होणार्या या लॉनमुळे बुलडाणा शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. या माध्यमातून नागरिकांना वॉकींग ट्रॅक म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूला या लॉनचा उपयोग करण्यात येणार या लॉनमुळे होणारे चिखल, गारा व दलदल कमी होण्यास मदत होते परिणामी नागरिकांना पायी चालणे सुलभ होणार आहे. आणखी काही दिवस वरुणराजाची कृपा राहिली तर येत्या पंधरा दिवसात ही लॉन पुर्णपणे विकसीत होणार आहे. बुलडाणा शहरातील नागरी वस्त्यांमधील रस्त्यांच्या दुतर्फा या लॉनच्या बिया टाकण्यात येणार असून नागरिकांनी या लॉनची सुरक्षितता राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांना आपल्या घरासमोर कमी पाण्यात उगविणारी लॉन लावावयाची असेल तर त्यांना बुलडाणा अर्बन सेफ्टी अँण्ड सिक्युरीटी कार्यालयात लॉनच्या बिया व कल्टीवेटरची सुविधा मिळणार आहे. इच्छूकांनी सदर बिया घेवून जाव्यात असे आवाहन ही करण्यात आले आहे.