शहरातून जाणा-या रस्त्याची अवस्था बिकट
By Admin | Updated: July 12, 2016 00:49 IST2016-07-12T00:20:46+5:302016-07-12T00:49:00+5:30
राज्य महामार्गावर खड्डय़ात केला बैठा सत्याग्रह!

शहरातून जाणा-या रस्त्याची अवस्था बिकट
देऊळगाव राजा (जि. बुलडाणा): बेराळा ते जालना १७६ राज्य महामार्ग रस्त्याची अक्षरश: वाट लागली आहे. देऊळगाव राजा शहरातून जाणार्या मार्गावर शेकडो खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे शहरातील संघर्ष ग्रुपच्यावतीने सोमवारी रस्त्यातील खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आले.
सततच्या वर्दळीने या खड्डय़ांचे आकारमान वाढत आहे. यामध्ये बहुतांश खड्डे एक ते दोन फूट खोल आहेत. यात पाणी साचून राहिल्याने खड्डय़ाच्या नेमका अंदाज येत नसल्यामुळे अनेकदा वाहनाचा अपघात घडत आहे. या मार्गाने प्रवास करणे म्हणजे जिवंतपणीच मरणयातना केल्याचा प्रत्यय येतो. याकरिता शहरातील संघर्ष ग्रुपचे प्रभाकर मान्टे खड्ड्यामध्ये बसून आंदोलन केले. जालना ते बेराळा फाटा हे अंतर ७८ कि.मी.चे चौपदरी करणाचे कामाचे निविदा के.टी. कन्स्ट्रक्शन इंदूर यांची शासन स्तरावर मंजूर झाल्याने नोंव्हेबर २00९ मध्ये त्यांना काम सुरु करण्याचा आदेश देऊन २४ महिन्यांचे मुदत देण्यात आली होती. नोंव्हेबर २0११ पर्यंंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मग के.टी. कन्स्ट्रक्शन यांचे खासगी अडचणीमुळे ही एजन्सी चौपदरी तर सोडाच एका बाजूने दोन पदरी रस्ता सुद्धा पूर्ण करु शकली नाही. हे काम वेळेच्या आत पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी सा.बां. विभागाची असतानासुद्धा त्यांनी या गोष्टीकडे कानडोळा केला. यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने, हे काम थंड बस्त्यात पडलेले आहे. आजरोजी देऊळगावराजा शहरातून जाणार्या रस्त्याची दुदर्शा अत्यंत खराब झाल्याने अपघात होण्याची भीती निर्माण होते आहे. अनेक नागरिकांना जिवास मुकावे लागत आहे.
या मार्गावर शाळा, महाविद्यालय, दवाखाने, पेट्रोल पंप असल्याने आपघात होण्याची शक्यता नकारता येत नाही, म्हणून स्थानिक संघर्ष ग्रुपचे प्रभाकर मान्टे यांनी खड्ड्यामध्ये बसून आंदोलन केले. दोन तासांत बांधकाम विभागाला जाग आली. शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली.