रस्ते बनलेत मृत्यूचे सापळे
By Admin | Updated: May 12, 2015 00:07 IST2015-05-11T23:37:50+5:302015-05-12T00:07:50+5:30
बुलडाणा (जि. बुलडाणा)-औरंगाबाद राज्य महामार्गावरील पुल क्षतिग्रस्त.

रस्ते बनलेत मृत्यूचे सापळे
धाड : बुलडाणा -औरंगाबाद या राज्य महामार्गावरील धाडजवळ नदीनाल्यावर असणारे पूल अपघातास आमंत्रण देणारे बनल्याने तात्काळ दुरूस्तीची मागणी होत आहे. काही पुलाची मोठी बिकड अवस्था झाली आहे. त्यामुळे येणार्या पावसाळ्यात वाहतूकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. धाडमधून औरंगाबादकडे जाणार्या रस्त्यावर धाडनजिक असलेला पुल पुर्णत: खचला असून त्याच्या दोन्ही संरक्षक बाजू तुटून पडल्या आहेत. पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे करडी संग्राहक तलावाचे बँक वॉटर या पुलाखाली साचते. पावसाळ्यात पुलावरील खड्यात पाणी साचणार असल्यामुळे या पुलावर मोठय़ा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. करडी धरणामुळे हा रस्ता महावितरणच्या पॉवर हाऊसपर्यंत प्रभावीत होत असून रस् त्यालगत धरणाची पाणी साचल्याने पावसाळ्यात येथे दलदल निर्माण होते. वारंवार मोठे खड्डे पडतात. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून थातुरमातूर उपाय करून रस्तादुरूस्ती करण्यात येते. परिणामी या रस्त्यावरील अपघाता त अनेकदा मोठी हानी झाली आहे. अशीच अवस्था धाडमधून जामठीकडे जाणार्या रस्त्याची असून हा संपूर्ण रस्ता उखडला आहे. नालीवर असलेल्या पुलांना भगदाड पडले आहे.