राजूर घाटात ट्रकला अपघात
By Admin | Updated: March 14, 2016 01:49 IST2016-03-14T01:49:07+5:302016-03-14T01:49:07+5:30
कपाशीने भरलेला ट्रक उलटला; जीवितहानी नाही.

राजूर घाटात ट्रकला अपघात
धामणगाव बढे (जि. बुलडाणा) : मलकापूर-बुलडाणा मार्गावर असलेल्या राजूर घाटातील देवीच्या मंदिरासमोर कपाशीने भरलेला ट्रक उलटला. हा अपघात १३ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. एमपी 0९ एचएफ ७६५७ क्रमाकांचा ट्रक परतूर येथून कपाशी घेऊन खांडवा (मध्य प्रदेश) येथे जात होता. सकाळी बुलडाणा येथून मलकापूरकडे जाणार्या एस.टी.बसने राजूर घाटात देवीच्या मंदिरासमोर कट मारल्याने सदर ट्रक अचानक उलटा झाल्याची माहिती ट्रक चालक शे. अयुब शे. शफी यांनी दिली. अपघातानंतर एस.टी. बस चालक बस न थांबविता निघून गेला. सदर ट्रक खांडवा येथील मो.अल्ताफ यांचा आहे. अपघाताच्या वेळी ट्रकमध्ये चालक शे.अयुब शे.शफी व अजमल वासकले दोघे रा.खंडवा उपस्थित होते. सुदैवाने त्यांना इजा झाली नाही. या रस्त्यावरील वळणावर गतिरोधक नसल्यामुळे दररोज लहान-मोठे अपघाताच्या घटना घडत असल्याचे दिसून येते.