नदी, नाले तुडुंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:39 IST2021-08-21T04:39:02+5:302021-08-21T04:39:02+5:30
दुचाकी चोरट्याचा तपास लावण्याची मागणी देऊळगाव राजा : शहरातील एका हॉटेलसमोरून दुचाकी लंपास झाल्याच्या घटनेमुळे दुचाकीचालकांमध्ये गोंधळ उडाला आहे. ...

नदी, नाले तुडुंब
दुचाकी चोरट्याचा तपास लावण्याची मागणी
देऊळगाव राजा : शहरातील एका हॉटेलसमोरून दुचाकी लंपास झाल्याच्या घटनेमुळे दुचाकीचालकांमध्ये गोंधळ उडाला आहे. रस्त्यावर वाहने उभी करावी की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे दुचाकी चोरट्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात आली. दुचाकी चोरटा वेळीच पकडला तर इतर घटनांनाही आळा बसेल, असे मतही स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
बुलडाणा ते नागपूर बस सुरू
बुलडाणा : कोरोना विषाणू संसर्गामुळे रातराणीसह लांबपल्ल्याच्या अनेक बसेस बंद करण्यात आल्या होत्या. आता हळूहळू बससेवा वाढविण्यात येत आहेत. बुलडाणा ते नागपूर ही रातराणी बससेवा मागील महिन्यातच सुरू करण्यात आली होती. परंतु प्रवाशी न मिळाल्याने बस बंद झाली होती. आता पुन्हा २० ऑगस्टपासून बुलडाणा ते नागपूर रातराणी बस सुरू करण्यात आली आहे.