शेतातील विद्युत तारेमुळे धोका !
By Admin | Updated: February 23, 2015 00:22 IST2015-02-23T00:22:03+5:302015-02-23T00:22:03+5:30
खामगाव तालुक्यातील प्रकार; शेतक-यांसह वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात.

शेतातील विद्युत तारेमुळे धोका !
खामगाव (बुलडाणा): शहरानजीक तसेच ग्रामीण वस्तीला लागून असलेल्या परिसरातील शे तीच्या कुंपणाला जिवंत विद्युत तार जोडणार्या शेतकर्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बेसावध क्षणी होणार्या विद्युत तारेच्या स्पर्शामुळे गेल्या वर्षांत २७ जनावरांसह एका शे तकर्याला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
खामगाव शहराला लागून असलेल्या शेतातील धान्य आणि इतर पिके चोरीस जाऊ नये तसेच या पिकांना वन्यप्राण्यांपासून धोका निर्माण होऊ नये, यासाठी बागायतदार शेतकरी आपल्या शे ताला तारेचे कुंपण घालतात; मात्र अंधारात या शेतकर्यांच्या शेतातील पिकांसह इतर साहित्य चोरीस जाण्याचे प्रमाण वाढीस लागले आहेत. त्यामुळे बचावात्मक पवित्रा म्हणून मानवी वस् तीलगतच्या शिवारातील बागायतदार शेतकरी आपल्या शेताला तारेचे कुंपण घालून त्यात रात्री विद्युत प्रवाह सोडतात. त्यामुळे वन्यजिवांसोबतच मानवी जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. विद्युत प्रवाह सोडण्यात आल्याची माहिती नसल्याने अनेकदा शेतकरी आणि शेतमजुरांना शॉक लागतो, तर काही वेळा मृत्यूलाही सामोरे जावे लागत असल्याचे प्रसंग समोर आले आहेत. तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथील एका शेतकर्याचा दोन महिन्यांपूर्वी अशा घटनाक्रमात मृ त्यू झाला. त्याचवेळी या शेतात दोन डुकरे आणि एका वन्यप्राण्याचा मृत्यू झाला.