जोरदार रस्सीखेच
By Admin | Updated: October 16, 2014 00:36 IST2014-10-16T00:36:27+5:302014-10-16T00:36:27+5:30
चिखली विधानसभा मतदारसंघात किरकोळ वाद वगळता, शांततेत मतदान.

जोरदार रस्सीखेच
चिखली (बुलडाणा) : महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी बुधवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये किरकोळ वाद वगळता, सर्वत्र शांततेत मतदान झाले. सकाळी ग्रामीण भागामध्ये तर शहरी भागामध्ये दुपारी ३ च्या नं तर मतदान प्रक्रियेने जोर धरला. सायंकाळी ५ वाजेपर्यंंत तालुक्यात सरासरी ४८.८७ टक्के एवढे मतदान झाले होते, तर सायंकाळी ६ वाजेपर्यंंत जवळपास ६७.६६ टक्के मतदान झाले. ग्रामीण भागामध्ये खरीप पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु असतानाही मतदान केंद्रावर गर्दी दिसून येत होती. सकाळी मतदान केंद्रावर वाढलेल्या गर्दीमध्ये नवमतदारांचा अधिक भरणा दिसून आला. तरुण मतदारांमध्ये उत्साह दिसत होता. चिखली मतदारसंघातील सावरगाव डुकरे येथे अनुराधा नगर परिसरामध्ये छात्रालयामध्ये वास्तव्याला असलेल्या विद्यार्थ्यांंच्या म तदानावरुन वाद निर्माण झाला होता, काहींनी या मतदारांवर आक्षेप घेतला होता; मात्र या विद्यार्थ्यांंची नावे मतदार यादीत असल्याने त्यांना मतदानापासून वंचित ठेवता येणार नाही, असे निवडणूक अधिकार्यांनी सांगून हे प्रकरण निवळले. असाच प्रकार तालुक्यातील बोरगाव वसु येथील मतदान केंद्रावरही झाला.
चिखली मतदारसंघ
एकूण मतदान २,६४,८६६
महिला १,२५,७१५
पुरुष १,३९,१५२
मतदान केंद्र २७२