मुकुल वासनिकांच्या भेटीने तालुक्यातील काँग्रेस पक्षात नवचैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:40 IST2021-08-20T04:40:04+5:302021-08-20T04:40:04+5:30

बद्रीसेठ वाघ यांच्या घरी जवळपास तासभर चाललेल्या भेटीगाठीत मुकुल वासनिकांनी जुन्या-जाणत्या, तसेच नवीन कार्यकर्त्यांची आस्थेने विचारपूस करत पीक-पाण्याची चौकशी ...

Revival of Congress party in the taluka with the visit of Mukul Wasnik | मुकुल वासनिकांच्या भेटीने तालुक्यातील काँग्रेस पक्षात नवचैतन्य

मुकुल वासनिकांच्या भेटीने तालुक्यातील काँग्रेस पक्षात नवचैतन्य

बद्रीसेठ वाघ यांच्या घरी जवळपास तासभर चाललेल्या भेटीगाठीत मुकुल वासनिकांनी जुन्या-जाणत्या, तसेच नवीन कार्यकर्त्यांची आस्थेने विचारपूस करत पीक-पाण्याची चौकशी करण्यापासून, तर अनेक जुन्या गोष्टींना उजाळा दिला. बद्रीसेठ वाघ, रंगनाथ डोईफोडे, मनोज कायंदे, तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे यांनी मतदारसंघातील काँग्रेस पक्षाची सर्व परिस्थिती विशद केली, तर आघाडीमुळे सामान्य कार्यकर्त्यांचे होत असलेले हाल, आगामी होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका व इतर अनेक समस्या मांडल्या. त्यावर आगामी काळात जास्तीत जास्त लक्ष सिंदखेड राजा मतदारसंघात देऊ, असे मुकुल वासनिकांनी आश्वस्थ केले. त्यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, मलकापूरचे आमदार राजेश एकडे, श्याम उमाळकर, विजय अंभोरे, संजय राठोड, जिप अध्यक्ष मनीषा पवार, प्रदीप नागरे, अशोकराव पडघान, कासम गवळी, नंंदकिशोर बोरे, दिगंबर मवाळ, प्रा. संतोष आंबेकर तथा जिल्ह्यातील तोलामोलाचे अनेक नेते, तर सिंदखेड राजा तालुक्यातील सिद्धार्थ जाधव, सुधीरअप्पा बेंदाडे, सत्यजित खरात, सोपानराव खरात, संजय जैस्वाल, नारायण खरात, राहुल साबळे, परमेश्वर खंदारे, जुनेद अली, सुनील जायभाये, समाधान काकड, सदानंद वाघमारे, कैलास साळवे, शिवाजी खरात, रहेमान शेख, अजीम कुरेशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Revival of Congress party in the taluka with the visit of Mukul Wasnik