शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

सुधारित वाहतूक नियम: परिपत्रकाअभावी पोलिसांपुढे पेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 12:35 PM

जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून यासंदर्भात परिपत्रक पोलिसांना प्राप्त झाले नसल्याने कारवाईत अडचण निर्माण झाली आहे

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: तीन दिवस झाले तरी नविन सुधारित मोटार वाहन कायद्याची जिल्हयात अद्याप अंमलबजावणी सुरु झाली नाही. नागरिकांकडून कायद्याचे उल्लंघन सुरुच असल्याचे मंगळवारी दुपारी दिसून आले. बुलडाणा जिल्ह्यात अद्याप जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून यासंदर्भात परिपत्रक पोलिसांना प्राप्त झाले नसल्याने कारवाईत अडचण निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकारीही या कायद्याबाबत अनभिज्ञ दिसून आल्याने कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करीत नितिन गडकरी यांनी मांडलेल्या विधेयकाला लोकसभेने काही दिवसांपूर्वी मंजुरी दिली आहे. देशभरात ०१ सप्टेंबरपासून सुधारित पद्धतीने दंड वसुली करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. आज चौथा दिवस उजाडला तरी अद्याप नविन सुधारित मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरु झाली नसल्याचे दिसून आले. खामगाव शहरातील अंतर्गत रस्त्यासह राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावर देखील वाहतूक नियमांचे उल्लंघन करतांना नागरिक आढळून आले. विशेष म्हणजे काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता नागरिकही याबाबत अनभिज्ञ दिसून आले.

कॅमेऱ्यांची असणार नजरपोलिस प्रशासनातर्फे शहरातील तसेच मुख्य मार्गावरील चौकात कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यामुळे वाहतूक पोलिस नसला तरी वाहनचालकांवर पोलिसांचे लक्ष असणार आहे. केंद्र सरकारने एम-परिवहन योजनेतून देशभरातील सर्व वाहनांचे क्रमांक, त्यांच्या मालकांचे नाव, पत्ते यांची एक समग्र डाटा बँक तयार केली आहे. काय करावे, पोलिसांना सुचेना१ सप्टेंबरपासून जरी सुधारित मोटार वाहन कायदा अस्तित्वात आला असला तरी या कायद्याची अंमलबजावणी अद्याप होवू शकली नाही. वाहतूक पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनाही नेमके काय करावे सुचेनासे झाले आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून अद्याप यासंदर्भात कोणत्याही सुचना प्राप्त नसल्याचे दिसून येते.

तर पाठवल्या जाईल कोर्टात!कायद्याचे उल्लंघन झाल्यास वाहतूक पोलिस वाहन जप्त करतील. न्यायालयाच्या ताब्यात देतील. आॅन द स्पॉट फाइन वसुली होणार नसल्याने वाहतूक नियम मोडणाºया प्रत्येकाला यापुढे न्यायालयात जाऊन फाइन भरावा लागेल. फाइन भरल्याची पावती जोडल्यानंतर कोर्टापुढे लायसन्स, आरसी बुक आणि जप्त केलेले वाहन परत मिळविण्यासाठी अर्ज करावा लागेल. हा अर्ज स्वीकारल्यानंतर कोर्ट जप्त केलेले सर्व साहित्य परत करण्यासाठी पोलिसांच्या नावाने सुपुर्दनामा तयार करेल.

सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार अद्याप कारवाई करण्यात आली नाही. यासंदर्भात नोटीफिकेशन प्राप्त झाले नाही. वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार निश्चित कायद्याची अंमलबजावणी करण्यात येईल. नागरिकांनी कायद्याचे पालन करावे.- संतोष ताले, पोलिस निरिक्षक, शहर पोलिस स्टेशन

टॅग्स :khamgaonखामगावTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसRto officeआरटीओ ऑफीस