कृषि संचालकांनी घेतला आढावा

By Admin | Updated: May 30, 2014 22:49 IST2014-05-30T22:47:29+5:302014-05-30T22:49:37+5:30

मेहकर तालुक्यातील कास्तकारांची भेट घेऊन कृषी अधिकार्‍यानी घेतला सोयाबीन बियाण्याचा आढावा.

Reviewed by the Agricultural Director | कृषि संचालकांनी घेतला आढावा

कृषि संचालकांनी घेतला आढावा

मेहकर : तालुक्यातील डोणगाव येथील शेतकर्‍यांची भेट घेऊन कृषि विभागातील संचालक व अधिकार्‍यांनी सोयाबीन बियाण्याचा आढावा घेऊन शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. कृषि विभागातील निवीष्ठा व गुणनियंत्रण संचालक जयवंतराव देशमुख यांनी तालुक्यातील डोणगाव येथील शेतकर्‍यांची भेट घेऊन सोयाबीन बियाणे उपलब्धता व पेरणीपूर्व सोयाबीनची घ्यावयाची उगवण चाचणी या बाबींचा आढावा घेऊन चर्चा केली. त्यांनी उपस्थित शेतकर्‍यांना व अधिकार्‍यांना सोयाबीन बियाण्याची घरच्या घरी उगवण चाचणी घेऊन गावातील उपलब्ध बियाणे जास्तीत जास्त पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन केले. कृषि विभागातील कर्मचारी व शेतकर्‍यांनी उगवण चाचणीसाठी ठेवलेल्या प्रात्यक्षिकांची यावेळी पाहणी केली. तालुका कृषि अधिकारी मधुकर काळे यांनी तालुक्यात उपलब्ध असलेल्या सोयाबीन बियाण्याबाबत तसेच पेरणीसाठी आवश्यक असलेल्या बियाण्यांची माहिती दिली. तालुक्यातील ८४ हजार ८३३ हेक्टर क्षेत्रापैकी ६५ हजार १२ हेक्टरवर सोयाबीनचा संभाव्य पेरा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सततच्या पावसामुळे सोयाबीन बियाण्याच्या उगवणीवर त्याचा प्रतिकुल परिणाम झालेला असल्यामुळे शेतकर्‍यांनी स्वत:कडील बियाणे, गावातून विकत घेतलेले बियाणे व बाजारातून घेतलेले बियाणे आदी उगवण चाचणी घेतल्याशिवाय पेरणी करु नये, याविषयी माहिती दिली.

Web Title: Reviewed by the Agricultural Director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.