जूनच्या स्वागताला वळिवाच्या सरी!

By Admin | Updated: June 2, 2017 01:07 IST2017-06-02T01:07:05+5:302017-06-02T01:07:05+5:30

खामगाव : गुरुवार १ जून रोजी पहाटेच्या सुमारास वळिवाच्या सरी कोसळल्याने जून महिन्याचे स्वागत पावसाने झाल्याचे सुखद चित्र खामगाव परिसरात दिसून आले.

The return of June is welcome! | जूनच्या स्वागताला वळिवाच्या सरी!

जूनच्या स्वागताला वळिवाच्या सरी!

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : गुरुवार १ जून रोजी पहाटेच्या सुमारास वळिवाच्या सरी कोसळल्याने जून महिन्याचे स्वागत पावसाने झाल्याचे सुखद चित्र खामगाव परिसरात दिसून आले.
जून महिन्यापासून पावसाळा सुरू होत असल्याचे मानले जाते. सर्वाधिक तीव्र उन्हाचा मे महिना बुधवारी संपला व गुरुवारी जूनच्या पहिल्याच दिवशी वळिवाच्या पावसाने हजेरी लावली. खामगाव शहरासह परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात काही काळ गारवा पसरला होता. दुपारनंतर पुन्हा उकाड्यात वाढ झाली; मात्र जून या पावसाळ्याच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात पावसाने झाली आहे.

Web Title: The return of June is welcome!