शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

परतीचा प्रवासच ठरला त्यांच्या जीवनाचा अखेरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 11:04 IST

The return journey was the last journey of his life : कॅम्पच्या दिशेने होणारा परतीचा प्रवासच त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरला.

- मुकूंद पाठक/ बाजीराव वाघलोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा/दुसरबीड : ‘समृद्धी’च्या कामासाठी मजुरांना घेऊन दैनंदिन पद्धतीने टिप्पर निघाला... पावसाची रिपरिप सुरूच होती... आज असे काही अघटित घडेल याची कोणालाच खबर नव्हती... मजुरांना घेऊन टिप्पर चालक साईटवर गेला, पण पाऊस असल्याने काम बंद असल्याचे सांगण्यात आल्याने मजुरांचा पुन्हा कॅम्पकडे परतीचा प्रवास सुरू झाला... आपल्यापुढे मरण वाढून ठेवले आहे, याची कल्पना कोणालाच नव्हती. सुटी मिळाल्याने सर्वचजण आनंदी होते. आजचा दिवस कॅम्पवर मुलाबाळांसोबत घालवायचा, असे अनेकांच्या मनात असेल. पण... पुढे काळ टपून बसला होता... आणि वेळ देखील आली होती... एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं... १३ जणांचे संसार उघड्यावर आले. एकप्रकारे कॅम्पच्या दिशेने होणारा परतीचा प्रवासच त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरला.सिंदखेड राजा तालुक्यातील तढेगाव फाट्यावर समृद्धी महामार्गाच्या कामावरून परत येत असलेला मजुरांचा टिप्पर एका वाहनाला साईड देताना अरुंद रस्त्यावरून उलटल्याने अपघात होऊन १५ पैकी १३ मजुरांचा मृत्यू झाला, तर दोन जणांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी ११:३० च्या सुमारास घडला. त्यामुळे सिंदखेड राजातील तढेगाव येथील समृद्धी कॅम्पवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मध्य प्रदेशातील या कामावरील मजूर नेहमीप्रमाणे शुक्रवारी आपल्या कामावर सकाळीच गेले. पण पावसामुळे समृद्धी महामार्गावरील काम बंद ठेवण्यात आल्याचे या मजुरांना सांगण्यात आले. त्यामुळे लोखंडी रॉड ठेवलेल्या टिप्परमध्ये बसून १५ मजुरांनी कॅम्पवर परतीचा मार्ग स्वीकारला. मात्र हा त्यांचा परतीचा प्रवास आयुष्याचा शेवटचा प्रवास असल्याची साधी कल्पनाही त्यांना नव्हती. दुसरबीडकडून तढेगाव कॅम्पकडच्या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ सी वरून वळल्यानंतर अवघ्या २०० फुटाच्या अंतरावर या टिप्परला अपघात होऊन तो उलटला. त्यामुळे त्यात बसलेले मजूर खाली दबले. त्यांच्या अंगावर लोखंडी रॉड व त्यावर टिप्पर असा हा विचित्र अपघात होता.

आक्रोष आणि असाहाय्यता...हा अपघात कॅम्पपासून अवघ्या तीन ते चार कि.मी. अंतरावर झाला. अपघाताची माहिती मिळताच कॅम्पवरील मजूरही घटनास्थळाकडे धावले. परंतु अजस्त्र टिप्पर, तसेच लोखंडी रॉड पाहता, नेमके मदतकार्य कसे करायचे, असाच प्रश्न सर्वांना पडला होता. आपले आप्तस्वकीय याखाली दबले गेल्याची जाणीव होताच, तेथे आक्रोष सुरू झाला होता. मदत करण्याची इच्छा असूनही परिस्थितीमुळे असाहाय्यता निर्माण झाली होती. जमेल त्या पद्धतीने त्यांना वाचविण्याचे प्रयत्न स्थानिकांनी सुरू केले. लोखंडी रॉडखाली निपचीत पडलेले मजूर पाहून उपस्थितांचे काळीज हादरून गेले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजाAccidentअपघात