बुलडाण्यात पेट्रोलपंपावरही निर्बंध; चार तासच राहणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 09:20 PM2020-03-24T21:20:59+5:302020-03-24T21:21:49+5:30

पेट्रोलपंपावरही निर्बंध; सकाळी चार तासच राहणार सुरू.

Restriction on Petrol pumps in Buldana; It will continue for four hours | बुलडाण्यात पेट्रोलपंपावरही निर्बंध; चार तासच राहणार सुरू

बुलडाण्यात पेट्रोलपंपावरही निर्बंध; चार तासच राहणार सुरू

googlenewsNext
href='https://www.lokmat.com/topics/buldhana/'>बुलडाणा: जिल्हयात संचारबंदीसह आपत्ती व्यवस्थापन व साथ रोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आलेला असतानाही रस्त्यांवर वाहनांची गर्दी कमी होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रीत करण्यासाठी पेट्रोलपंपावरही निर्बंध लादण्यात आले असून सकाळी सहा ते सकाळी दहा वाजेपर्यंत असे चार तासच पेट्रोलपंप सुरू राहणार आहेत.यासंदर्भात जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी रात्री उशिरा आदेश निर्गमित केला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांना एका ठिकाणी गर्दी करू नये ये तथा मानवी जिवीतास, आरोग्यास किंवा सुरक्षेला धोका निर्माण होवू नये म्हणून वारंवार सुचना देवूनही त्याचे पालन होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल व डिझेल विक्री केंद्रावर निर्बंध लादणे आवश्यक झाल्याचे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी २४ मार्च रोजी रात्री काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. त्यानुषंगाने हे निर्बंध लादण्यात आले असून आता फक्त सकाळी सहा ते सकाळी दहा असे अवघे चार तासच पेट्रोलपंप सुरू राहणार आहे. २४ मार्च पासून ३१ मार्च पर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. ग्रामपंचायत परिसरात फवारणी करण्याचे निर्देशजिल्ह्यातील ग्रामीण भागातही विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतींनी परिसरात निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सोबतच ग्रामीण भागात जिवनावश्यक वस्तुंचा तुटवडा जाणवणार नाही याचीही ग्रामपंचायतींनी दक्षता घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्रशासनासह संबंधीत अधिकाºयांसाठी जिल्हाधिकारी यांनी हे आदेश निर्गमीत केले आहे.

Web Title: Restriction on Petrol pumps in Buldana; It will continue for four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.