पावसामुळे शेतीकामांना विश्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:39 IST2021-08-20T04:39:43+5:302021-08-20T04:39:43+5:30
जिल्ह्यात २९ रुग्णांवर उपचार बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये एकूण २९ ...

पावसामुळे शेतीकामांना विश्रांती
जिल्ह्यात २९ रुग्णांवर उपचार
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये एकूण २९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपासून ॲक्टीव रुग्णांची ही संख्या ३० ते ४० दरम्यानच राहत आहे.
गाव तलावातील जलसाठ्यात वाढ
बुलडाणा : बुधवारी रात्रीदरम्यान झालेल्या पावसामुळे गाव तलावातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. गाव तलावामध्ये पावसामुळे जलसंचय झाला आहे. गाव तलावाच्या खोदकामातून काही ठिकाणी रस्ता बांधकामासाठी आवश्यक असलेल्या गौण खनिजाचीही गरज याच गावतलावातून भागविण्यात आली. त्यातूनच काही गाव तलावाची निर्मिती झाली आहे.
आर्थिक साक्षरतेची गरज
मोताळा: तालुक्यातील पीक कर्ज वाटपाचा टक्का गेल्या दोन वर्षात घटला आहे. त्यामुळे यंदा तो वाढविण्यावर बँकेने जोर दिला आहे. पात्र शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज वाटप करण्यात येत असले तरी शेतकऱ्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्याच्या दृष्टीने अधिक प्रयत्न होण्याची गरज आहेत.