शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात मतदानाला सुरुवात, मतदारांची केंद्रांवर गर्दी
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

सभापतींच्या राजीनामा नाट्यावर खामगावातच फैसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 1:52 AM

खामगाव :  पालिकेतील सत्ताधा-यांमध्ये सुरू असलेली धुसफूस अखेर सोमवारी चव्हाट्यावर आली. बांधकाम सभापतींच्या नाराजीनाम्यावर मुंबईत कोणताही निर्णय झाला नसल्याने सभापतींची मनधरणी करून पक्षश्रेष्ठींनी त्यांना परत पाठविले. त्यामुळे पालिकेतील राजकीय घडामोडीवर आता गुरुवारी खामगावातच फैसला होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

ठळक मुद्देनेतृत्वासमोर पेच सत्ताधा-यांमधील धुसफूस चव्हाट्यावर! 

अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  पालिकेतील सत्ताधा-यांमध्ये सुरू असलेली धुसफूस अखेर सोमवारी चव्हाट्यावर आली.  बांधकाम सभापतींच्या नाराजीनाम्यावर मुंबईत कोणताही निर्णय झाला नसल्याने सभापतींची मनधरणी करून पक्षश्रेष्ठींनी त्यांना परत पाठविले. त्यामुळे पालिकेतील राजकीय घडामोडीवर आता गुरुवारी खामगावातच फैसला होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा बरोबर नसल्याची तक्रार आपणाकडे (बांधकाम सभापतींकडे) नागरिक करीत आहे. नागरिकांच्या या तक्रारींचे समाधान करू शकत नाही. सोबतच निकृष्ट दर्जाच्या कामांचे खापर आपणावर फुटू नये, यासाठी आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद करीत बांधकाम सभापती शोभा रोहणकार यांनी सोमवारी नगराध्यक्ष अनिता डवरे यांच्याकडे राजीनामा सादर केला. सभापतींनी राजीनामा देताच, पालिकेत सत्ताधाºयांमध्ये सुरू असलेली अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली. सभापतींपाठोपाठ स्वीकृत नगरसेवक संदीप वर्मा यांनीही राजीनाम्याचा अल्टिमेटम दिला. वर्मा यांनी प्रत्यक्षात राजीनामा दिला नसला, तरी बांधकाम सभापतींच्या नाराजीनामा नाट्यांमुळे सत्ताधाºयांच्या अंतर्गत कलहाची लक्तरे वेशीवर टांगली जात असतानाच, भाजपनेते ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी बांधकाम सभापतींना तत्काळ मुंबईत बोलावून घेतले. आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत बांधकाम सभापतींचे पुत्र महेंद्र रोहणकार यांचे म्हणणे ऐकून घेतले; मात्र यासंदर्भात कोणताही निर्णय देण्यापूर्वी आपण गुरुवारी खामगावात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सभापतींच्या राजीनाम्याच्या निर्णयावर गुरुवारपर्यंत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे; परंतु  या प्रकारामुळे सत्ताधाºयांच्या अंतर्गत कलहाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेलीत, एवढे मात्र निश्चित!

ना. फुंडकरांशी रोहणकार यांची चर्चा!शोभा रोहणकार यांचे पुत्र तथा भाजप पदाधिकारी महेंद्र रोहणकार यांनी मंगळवारी पहाटेच मुंबई गाठली. दुपारी ना. भाऊसाहेब फुंडकर आणि आ. आकाश फुंडकर यांच्याशी त्यांनी यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली; मात्र त्यांच्यात कोणती चर्चा झाली, हे कळू शकले नाही. 

राजीनामा नाट्याला वेगळे वळण!बांधकाम सभापती शोभा रोहणकार यांनी नगराध्यक्ष अनिता डवरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर पालिकेत राजकीय भूकंप झाला आहे. तथापि, रोहणकार यांनी राजीनामा दिला की त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले, अथवा त्यांना वर्तणुकीमुळे राजीनामा देण्यास वरिष्ठांनी सांगितले, अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगत आहे. 

नगरसेवक पदाच्या राजीनाम्याचाही अल्टिमेटम!पालिकेत दुसºयांच्या इशाºयावर कामकाज करण्यास स्पष्ट नकार देत, बांधकाम सभापती पदाचा राजीनामा सादर करणाºया शोभा रोहणकार यांनी नगरसेवक पदातही आपणाला कोणतेही स्वारस्य नसल्याचे पक्षश्रेष्ठींकडे नमूद केले. तसेच शोभा रोहणकार यांच्या नगरसेवक पदासोबतच त्यांचे पुत्र तथा माजी उपाध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे संघटनात्मक पदाधिकारी असलेले महेंद्र रोहणकार यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा सादर करण्याचा अल्टिमेटम दिल्याचा दावा विश्वसनीय सूत्रांचा आहे. त्याचवेळी स्वीकृत नगरसेवक संदीप वर्मादेखील आपल्या राजीनाम्यावर अडून आहेत. 

काँग्रेस नगरसेवक गैरवर्तणूक प्रकरणावर ‘विरजण’!खामगाव पालिकेच्या विविध सभांमध्ये वारंवार गोंधळ तसेच सभेची नोटीस वेळेत पाठविल्यानंतर ती न घेता वेळेवर मिळाली नसल्याचे सांगून काही नगरसेवकांकडून गैरवर्तनप्रकरणी नगराध्यक्ष अनिता डवरे यांनी काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना नोटीस बजावली. या नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी पालिकेची २१ मार्च रोजी खास सभाही घेण्यात आली, त्यानंतर यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात येत असतानाच, अचानक सत्ताधाºयांची आपसातच जुंपली.   

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा