४८ ग्रा.पं.च्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:32 IST2021-02-05T08:32:12+5:302021-02-05T08:32:12+5:30

तहसीलदार सारिका भगत यांनी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण केली. जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणामध्ये (सर्वसाधारण प्रवर्गात) असलेल्या २३ ग्रामपंचायत ...

Reservation of Sarpanch post of 48 Gram Panchayats announced | ४८ ग्रा.पं.च्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

४८ ग्रा.पं.च्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

तहसीलदार सारिका भगत यांनी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण केली. जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणामध्ये (सर्वसाधारण प्रवर्गात) असलेल्या २३ ग्रामपंचायत याप्रमाणे:-गिरोली बुद्रूक, गिरोली खुर्द, गोळेगाव, अंभोरा, तुळजापूर ,निमगाव गुरु, रोहणा, टाकरखेड भगिले, मेहुणा राजा, सिनगांव जहांगीर, पांगरी-वाडी, खल्याळ गव्हाण, देऊळगाव मही, गारखेड, डोढरा,धोत्रा नंदई, सुरा, टाकरखेड वायाळ, बायगाव बुद्रूक, पाडळी शिंदे, मेंडगाव, पिंप्री आंधळे, सरंबा, या ग्रामपंचायतचा समावेश आहे (नागरिकांचा मागास प्रवर्गात)असलेल्या १३ ग्रामपंचायत:- सावखेड भोई, भिवगाव बुद्रूक, पिंपळगाव चिलमखा, जवळखेड, उंबरखेड, पळसखेड झाल्टा, चिंचोली बुरकुल, गोंधनखेड, दगडवाडी, चिंचखेड, बायगाव खुर्द, नारायणखेड, नागनगाव, (अनुसूचित जाती प्रवर्गात) असलेल्या ११ ग्रामपंचायत:- सावंगी टेकाळे, बोराखेडी बावरा, शिवणी आरमाळ, आळंद,अंढेरा,पिंपळगाव बुद्रूक,डिग्रस बुद्रूक, सावखेड नागरे, असोला जहांगीर, मंडपगाव, गारगुंडी यांचा समावेश आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गात असलेली वाकी बुद्रूक ग्रामपंचायतीचा समावेश आहे. पुढील पाच वर्षांसाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. तसेच अनुसूचित जाती प्रवर्ग, अनुसूचित जमाती प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गाकरिता महिलांसाठी राखीव जागांची सोडत जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या अध्यक्षतेखाली २९ जानेवारी रोजी शुक्रवारी जिल्हा नियोजन समिती सभागृह बुलडाणा येथे काढण्यात येणार आहे.

Web Title: Reservation of Sarpanch post of 48 Gram Panchayats announced