शेतक-यांच्या मागणीसाठी राज्यपालांना निवेदन

By Admin | Updated: November 7, 2014 23:12 IST2014-11-07T23:12:53+5:302014-11-07T23:12:53+5:30

माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांच्या नेतृत्वात शेतक-यांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट.

Request to the Governor for the demand of farmers | शेतक-यांच्या मागणीसाठी राज्यपालांना निवेदन

शेतक-यांच्या मागणीसाठी राज्यपालांना निवेदन

डोणगाव (बुलडाणा) : बुलडाणा जिल्हय़ातील शेतकर्‍यांना हेक्टरी ५0 हजार रुपये देण्याच्या मागणीसाठी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची ६ नोव्हेंबरला राजभवन नागपूर येथे भेट घेऊन चर्चा केली. खरीप हंगामात बुलडाणा जिल्हय़ातील शेतकर्‍यांचे नुकसानच झाले आहे. त्यांना ५0 हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली. यावेळी राज्यपालांनी संपूर्ण निवेदन वाचून प्रत्येक मुद्यावर शिष्टमंडळाशी चर्चा केली. शेतकर्‍यांसाठी आपले शासन निश्‍चितच पुढाकार घेणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. बुलडाणा जिल्हा परिषदेने याबाबत सर्वसाधरण सभेत ठराव घेतला असल्याचीही माहिती राज्यपालांना दिली. त्याचबरोबर बुलडाणा जिल्हय़ातील सिंचन समस्या, विद्युत समस्या व शेतकर्‍यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी राज्यपालांनी बुलडाणा जिल्हय़ात येऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणीही माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी यावेळी केली.

Web Title: Request to the Governor for the demand of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.