पीक कर्जाचे व्याजासह होणार पुनर्गठण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 02:50 IST2016-04-21T02:08:39+5:302016-04-22T02:50:06+5:30
पुढील पाच वर्षांसाठी होणार पुनर्गठण.

पीक कर्जाचे व्याजासह होणार पुनर्गठण!
बुलडाणा : शासनाने दुष्काळग्रस्त शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी २0१५-१६ मध्ये घेतलेल्या पीक कर्जाचे व्याजासह पुनर्गठण करण्यास मान्यता दिली आहे. पुढील पाच वर्षांसाठी पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यात येणार आहे. खातेदार शेतकर्यांनी संबंधित बँकेच्या शाखेशी ३0 एप्रिलपयर्ंत संपर्क साधून पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने बुधवारी केले आहे.
जिल्ह्यातील १ हजार ४२0 गावांमध्ये सन २0१५-१६ या आर्थिक वर्षात खरीप हंगामामध्ये ५0 पेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती, त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांना या आधीच दुष्काळी परिस्थितीतील सवलती लागू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यासाठी कृषी पीक कर्जाचे उद्दिष्ट गतवर्षीपेक्षा १00 कोटी रुपयांनी वाढवून १ हजार ३६५ कोटी रुपये केले आहे, त्यामुळे खरीप हंगाम व रब्बी हंगामात प्रत्येक खातेदार व नवीन कर्ज घेणार्या शेतकर्याला पीक कर्ज मिळणार आहे. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शासनाने कृषी कर्जाचे पुनर्गठण करण्याचा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
आतापयर्ंत कधीही कर्ज न घेतलेल्या शेतकर्यांनी नवीन पीक कर्ज घेण्यासाठी ३0 एप्रिलपयर्ंत बँकेशी संपर्क साधून अर्ज करावयाचा आहे. तर पुनर्गठण व सन २0१६-१७ वर्षांसाठीच्या पीक कर्जासाठी खातेदार शेतकर्यांनी बँकेशी संपर्क साधावयाचा आहे.
त्याचप्रमाणे रब्बी हंगाम २0१५-१६ साठी पीक कर्ज घेतलेल्या खातेदार शेतकर्यांच्या कर्जाचेही व्याजासह पुनर्गठण करण्यात येणार आहे.