डेंग्यूचा भ्रम दूर करून उपाययोजना करा
By Admin | Updated: November 22, 2014 01:09 IST2014-11-22T01:09:44+5:302014-11-22T01:09:44+5:30
आमदार सपकाळांचे निर्देश: मुख्य कार्यपालन अधिका-यांशी चर्चा.

डेंग्यूचा भ्रम दूर करून उपाययोजना करा
बुलडाणा : जिल्ह्यात सुरू असलेल्या डेंग्यूसदृश तापाच्या साथीबाबत प्रशासनाकडे असलेली आकडेवारी वेगळी आहे. हिवताप विभाग डेंग्यू नसल्याचे सांगते. खासगी दवाख्यान्यात डेंग्यूचे रुग्ण असल्याचे दाखले मिळतात त्यामुळे जनतेमधील संभ्रम दूर करून तापाचे निदान व्हावे तसेच तातडीने उपाययोजना करून जनतेला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेने सत्वर कार्यवाही करावी, असे निर्देश आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दिले.
जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून तापाच्या साथीने डोके वर काढले आहे. शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांची भेट घेतली. यावेळी जि.प. अध्यक्ष अलका खंडारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती सुलोचना पाटील, समाजकल्याण सभापती गणेश बस्सी, जि.प. सदस्य अनिल खाकरे, अशोक पडघान, चित्रांगण खंडारे, शरद पाटील उपस्थित होते.
आ. सपकाळ यांनी आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या आजार सा थीबाबत जनतेचे समाधान केल्या जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच आरोग्य यंत्रणोमध्ये निर्माण झालेल्या शिथिलतेबद्दल खेद व्यक्त केला. जर आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने डेंग्यूची लागण झालेली नाही तर सध्याची साथ ही कोणत्या ता पाची आहे, याबाबत तातडीने संशोधन व निदान करून योग्य त्या दिशेने रुग्णांवर औषधोपचार करण्याचे दिशानिर्देश आरोग्य यंत्रणेला देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली.