शेतीच्या वादातून शिवीगाळ; चौघांवर गुन्हा

By Admin | Updated: June 19, 2015 02:33 IST2015-06-19T02:33:09+5:302015-06-19T02:33:09+5:30

खामगाव तालुक्यातील घटना.

Removal of farming controversy; Crime against four | शेतीच्या वादातून शिवीगाळ; चौघांवर गुन्हा

शेतीच्या वादातून शिवीगाळ; चौघांवर गुन्हा

खामगाव : शेतीच्या वादातून चौघांनी एकास शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना १७ जून रोजी शहरानजीकच्या वाडी शिवारात घडली. स्थानिक झुलेलाल नगरातील प्रमोद जीवनराम भोजवानी (७0) त्यांच्या वाडी शिवारातील शेतात गेले असता तुळशीराम अभिमान वाघोदे, सुभाष तुळशिराम वाघोदे व सुनिल वाघोदे रा.तायडे कॉलनी यांनी त्यांचेशी वाद घालून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भोजवानी यांनी शहर पो.स्टे.ला तक्रार दिली. यावरुन पोलिसांनी वाघोदे पितापुत्रांवर कलम ५0४,५0६ भादंवीनुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

Web Title: Removal of farming controversy; Crime against four