शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दिलासा:  बुधवारपासून राज्यात कापूस खरेदीस सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 16:52 IST

१५ एप्रिलपासून नाफेडमार्फत तूर-हरभरा खरेदी तर कापूस पणन महामंडळामार्फत कापूस खरेदी सुरु होणार आहे. 

ठळक मुद्देकापूस खरेदी प्रक्रिया १५ एप्रिल पासून सुरू होणार असल्याने शेतमालाची चिंता मिटली आहे.घरात सोन्यासारखा कापूस असूनही शेतकरी हतबल झाले होते. कापूस विक्रीची वेळ आली असतानाच देशात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली.

- योगेश फरपट लोकमत न्युज नेटवर्क खामगाव: लॉकडाऊनमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत होते. बुलडाणा जिल्हयातील शेतकºयांनी आपल्या व्यथा सोशल मिडियाच्या माध्यमातून मांडल्या होत्या. जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याशी चर्चा केली. याची दखल घेत येत्या बुधवारपासून म्हणजेच १५ एप्रिलपासून नाफेडमार्फत तूर-हरभरा खरेदी तर कापूस पणन महामंडळामार्फत कापूस खरेदी सुरु होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात २५ मार्च पासून १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाउन च्या कालावधीत नाफेड तूर हरभरा खरेदी केंद्र व कापूसपणन महामंडळ मार्फत कापूस खरेदी प्रक्रिया बंद करण्यात आली होती यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. शेतकºयांचा शेतमाल पडून राहत असल्यामुळे ही खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे. नाफेड तूर- हरभरा खरेदी, कापूसपणन महामंडळ मार्फत कापूस खरेदी प्रक्रिया १५ एप्रिल पासून सुरू होणार असल्याने शेतमालाची चिंता मिटली आहे. बुलडाणा जिल्हयासह यवतमाळ, अकोला, अमरावती, धुळे, जळगाव या जिल्हयांमध्ये कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने कापूसही चांगला झाला. मात्र कापूस विक्रीची वेळ आली असतानाच देशात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली. घरात सोन्यासारखा कापूस असूनही शेतकरी हतबल झाले होते. तुर, हरभरा व कापूस या शेतमालाच्या खरेदीची प्रक्रिया सुरु करण्यासंदर्भात बुलडाणा जिल्हयाचे पालकमंत्री तथा अन्न, औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. बैठकीला मुख्य सचिव अजोय मेहता, अप्पर मुख्य सचिव (वित्त) मनोज सैनिक व पणन विभागाचे सचिव अनुपकुमार उपस्थित होते. १५ एप्रिलपासून कापूस खरेदी पुन्हा सुरु होणार असल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावDr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणेcottonकापूस