शेतकऱ्यांना दिलासा:  बुधवारपासून राज्यात कापूस खरेदीस सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 04:50 PM2020-04-13T16:50:45+5:302020-04-13T16:52:46+5:30

१५ एप्रिलपासून नाफेडमार्फत तूर-हरभरा खरेदी तर कापूस पणन महामंडळामार्फत कापूस खरेदी सुरु होणार आहे. 

Relief to farmers: Cotton procurement begins in the state from Wednesday | शेतकऱ्यांना दिलासा:  बुधवारपासून राज्यात कापूस खरेदीस सुरुवात 

शेतकऱ्यांना दिलासा:  बुधवारपासून राज्यात कापूस खरेदीस सुरुवात 

Next
ठळक मुद्देकापूस खरेदी प्रक्रिया १५ एप्रिल पासून सुरू होणार असल्याने शेतमालाची चिंता मिटली आहे.घरात सोन्यासारखा कापूस असूनही शेतकरी हतबल झाले होते. कापूस विक्रीची वेळ आली असतानाच देशात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली.

- योगेश फरपट 
लोकमत न्युज नेटवर्क 
खामगाव: लॉकडाऊनमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत होते. बुलडाणा जिल्हयातील शेतकºयांनी आपल्या व्यथा सोशल मिडियाच्या माध्यमातून मांडल्या होत्या. जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याशी चर्चा केली. याची दखल घेत येत्या बुधवारपासून म्हणजेच १५ एप्रिलपासून नाफेडमार्फत तूर-हरभरा खरेदी तर कापूस पणन महामंडळामार्फत कापूस खरेदी सुरु होणार आहे. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात २५ मार्च पासून १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाउन च्या कालावधीत नाफेड तूर हरभरा खरेदी केंद्र व कापूसपणन महामंडळ मार्फत कापूस खरेदी प्रक्रिया बंद करण्यात आली होती यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. शेतकºयांचा शेतमाल पडून राहत असल्यामुळे ही खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे. नाफेड तूर- हरभरा खरेदी, कापूसपणन महामंडळ मार्फत कापूस खरेदी प्रक्रिया १५ एप्रिल पासून सुरू होणार असल्याने शेतमालाची चिंता मिटली आहे. बुलडाणा जिल्हयासह यवतमाळ, अकोला, अमरावती, धुळे, जळगाव या जिल्हयांमध्ये कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने कापूसही चांगला झाला. मात्र कापूस विक्रीची वेळ आली असतानाच देशात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली. घरात सोन्यासारखा कापूस असूनही शेतकरी हतबल झाले होते. तुर, हरभरा व कापूस या शेतमालाच्या खरेदीची प्रक्रिया सुरु करण्यासंदर्भात बुलडाणा जिल्हयाचे पालकमंत्री तथा अन्न, औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. बैठकीला मुख्य सचिव अजोय मेहता, अप्पर मुख्य सचिव (वित्त) मनोज सैनिक व पणन विभागाचे सचिव अनुपकुमार उपस्थित होते. १५ एप्रिलपासून कापूस खरेदी पुन्हा सुरु होणार असल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. 

Web Title: Relief to farmers: Cotton procurement begins in the state from Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.