धाड पोलिसांचे धाडसत्र; गुटखा जप्त
By Admin | Updated: June 1, 2017 00:10 IST2017-06-01T00:10:06+5:302017-06-01T00:10:06+5:30
धाड : जामठी शिवारात ३२ हजारांची गावठी दारू नष्ट करून गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केल्यानंतर, ३० मेच्या रात्री म्हसला खुर्द येथील एका इसमाच्या घरातून सहा पोते गुटखा जप्त करण्यात आला.

धाड पोलिसांचे धाडसत्र; गुटखा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
धाड : जामठी शिवारात ३२ हजारांची गावठी दारू नष्ट करून गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केल्यानंतर, ३० मेच्या रात्री म्हसला खुर्द येथील एका इसमाच्या घरातून सहा पोते गुटखा जप्त करण्यात आला. तसेच मढमधून एका महिलेस देशी दारूची विक्री करताना अटक करण्यात आली.
ठाणेदार संग्राम पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून, त्यांनी आपल्या पथकासह जामठीपासून साधारण दोन कि.मी. जंगलात असणाऱ्या गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा मारला असता त्याठिकाणी तब्बल ३२० लीटर हातभट्टीची दारू निर्माण करून, १६ डब्यात (पिपा) भरून होती. त्याठिकाणी पोलिसांनी पाहणी करून ती गावठी दारू पंचनामा करून जागेवरच नष्ट केली. ह्या प्रकरणी जामठीमधील आरोपी जुम्मन सुलेमान जाधव व युनुस लालू जाधव ह्या आरोपींवर मुप्रोका ६५(ड) नुसार कारवाई केली.
३१ मे रोजी म्हसला येथील आरोपी समाधान भगवान पांडे ह्या इसमाच्या घरी अवैधरीत्या गुटखा साठवला असल्याची गुप्त माहितीवरून ठाणेदार पाटील यांच्यासह पथकाने छापा मारून तब्बल सहा पोते गुटखा (३३० गुटखा पाकीट) जप्त केला. यावेळी अन्न व औषध विभागाचे अधिकारी गोपाल माहुरे उपस्थित होते. हा गुटखा ३९ हजार ६०० रुपायांचा असून, ह्या प्रकरणी पोलिसांनी गुटख्यासह आरोपी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात दिला आहे. तसेच मढमधील आरोपी शायराबाई अहमद बागुल ह्या महिलेकडून दारू जप्त केली आहे. कारवाईत एएसआय गजानन मुंडे, ना.पो.कॉ. प्रकाश दराडे, ऋषिकेश पालवे, माधव कुटे, प्रताप भुतेकर आदींनी सहभाग घेतला.