पक्षाघात झालेल्या वृद्धाला भेटले नातेवाईक
By Admin | Updated: November 28, 2015 02:41 IST2015-11-28T02:41:13+5:302015-11-28T02:41:13+5:30
सामाजिक बांधीलकीचा प्रत्यय.

पक्षाघात झालेल्या वृद्धाला भेटले नातेवाईक
मनोज पाटील /मलकापूर (जि. बुलडाणा) : मुलाकडे गावी जात असताना अचानक पक्षाघात झालेल्या एका वृद्ध इसमाला भुसावळ येथील टॅक्सी चालक, मलकापूरचे पोलीस अधिकारी व उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांच्या सामाजिक बांधीलकीमुळे २१ नोव्हेंबर रोजी उपचारार्थ मलकापूर येथून बुलडाणा सामान्य रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त ह्यलोकमतह्ण ने २३ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केले होते. या वृत्तावरून सदर इसमाची ओळख पटली व त्याचे नातेवाईक त्यांना मिळाले आहेत. वानखेड येथील तुळशीराम पाटील हे मुलाकडे जात असताना त्यांना पक्षाघात झाला त्यावेळी त्यांच्या तोंडून मलकापूर हा एक शब्द ऐकल्याने तेथील सुधीर चौधरी रा.खंडाळा ता. भुसावळ या टॅक्सी चालकाने या वृद्धास मलकापूर पोलीस स्टेशनला आणले होते.सपोनि गवारगुरू यांनी तत्काळ मलकापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉ. सोपान चव्हाण व डॉ. जैन या वैद्यकीय अधिकार्यांनी त्या वृद्धावर उपचार सुरू केले. याबाबतचे वृत्त ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित झाल्यानंतर घाणखेड येथे पंचर दुरुस्तीचे काम करणार्या गोविंदा चव्हाण नामक इसमाने सदर वृत्तांत संजय राजाराम पाटील यांना दाखविला असता बातमीतील फोटो हा त्याचे काका तुळशीराम पाटील यांचा असल्याची बाब समोर आली. त्यावरून चव्हाण यांनी सपोनि गवारगुरू यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात जाऊन भेट घ्यावी, असे सांगितले.