कोरोना महामारीच्या काळात अनेक कलाकार, कीर्तनकार, तबला, ढोलकी, पेटीवादक, टाळकरी यासह अनेक कलाकार बेरोजगार झाले आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कलाकार, कीर्तनकार, भारुडकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, प्रवचनकार यासह जे जे कलाक्षेत्रात मोडतात त्या सर्वांना शासनाने ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. अशा कलाकारांनी आपली नावे वारकरी महामंडळाच्या तालुका अध्यक्षांजवळ नोंदवावी. सिंदखेडराजा तालुक्यातील कलाकारांनी पंजाबराव बिल्लारी महाराज, मेहकर तालुक्यातील संतोष महाराज खडसे, लोणार तालुक्यातील किरण महाराज शिंदे, चिखली तालुक्यातील उध्दव महाराज जंजाळ, बुलडाणा तालुक्यातील शरद महाराज काळे, देऊळगावराजा तालुक्यातील बंडोपंत महाराज चेके, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर तालुक्यातील गजानन महाराज उन्हाळे, राजेंद्र तळेकर यांच्याकडे ३० ऑगस्टपूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही नावे जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात येणार असल्याची माहिती दामुआण्णा शिंगणे यांनी दिली.
वारकरी संप्रदायातील व्यक्तींची नोंदणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:40 IST