शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: आज रेडे गुवाहाटीला गेलेत, महाराष्ट्रातले देव संपले का? संजय राऊतांनी बुलढाण्याचे ऐतिहासिक महत्व सांगितले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 17:30 IST

आज ४० रेडे गुवाहाटीला गेलेत त्यांचे लक्ष इकडे लागलेय; संजय राऊतांनी बुलढाण्याचे ऐतिहासिक महत्व सांगितले 

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आज बुलढाण्यात सभा सुरु आहे. यामध्ये हजारोंच्या संख्येने शिवसैनिक जमले असून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या पेटलेल्या मशाली गद्दारांचे खोके बेचिराख केल्याशिवाय राहणार नाहीत, गद्दारीची बिजे जी रोवली गेलीत ती कायमची उखडून फेकण्याची जबाबदारी या मशालींवर, असे म्हटले आहे. 

सर्वात जास्त खोके बुलढाण्यात आलेत. आज रेडे गुवाहाटीला गेलेत, महाराष्ट्रातले देव संपले का? हा ज्ञानेश्वरांचा महाराष्ट्र, ज्यांनी रेड्याच्या तोंडून वेद वदविले, आणि हे मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी देण्यासाठी गुवाहाटीला गेलेत, अशी टीका राऊतांनी केली. 

शिवसेना आणि उद्धव ठाकरेंसाठी मी १०० दिवस काय जन्मठेपेसाठी तयार आहे. राज्य कायद्याने नाही, बेकायद्याने चालले आहे. बेकायदेशीर सरकार आपल्या बोडक्यावर बसविलेले आहे, ते जाणार. मी तुरुंगात जाताना हा भगवा माझ्यासोबत होता, अखेरच्या श्वासापर्यंत हा भगवा माझ्यासोबत राहिल असे म्हणालो होतो. आताही तो सोबत आहे. शिवसैनिक विकत घेता येणार नाही, असेही राऊत म्हणाले.

या बुलढाणा जिल्ह्यात आलेले सगळे खोके आणि सरकार यांनी फक्त जिल्ह्याचीच नाही तर महाराष्ट्राची बदनामी केली. महाराष्ट्राला इतिहास आहे तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये, इतर राज्यांना भुगोल आहे. या जिल्ह्यात जिजामाता जन्माला आल्या, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला. म्हणून पहिली सभा बुलढाण्यातून सुरु केली आहे, असा इतिहास राऊतांनी सांगितला. आज ४० रेडे गुवाहाटीला गेलेत त्यांचे लक्ष इकडे लागले आहे. कारण हे नवस करून आणलेले लोक नाहीत, ते चटणी-भाकरी घेऊन आलेले लोक आहेत. शिवसेना आधीपेक्षा जोमाने पुढे जातेय. ही घोडदौड आता थांबता नये. तुम्ही चाळीस फोडले असाल पण विदर्भातले ४० लाख आमच्यासोबत आहेत. वतनदार फोडले असतील, पण हा मावळा आमच्यासोबत आहे, असे राऊत म्हणाले. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना