शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘झेडपी’तील पदभरतीचा निघाला मुहूर्त; राज्यात १३ हजार ५७० जागा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 17:51 IST

बुलडाणा: बहुप्रतीक्षेनंतर निवडणुकांच्या तोंडावर ‘झेडपी’तील पदभरतीचा मुहूर्त निघाल आहे. राज्यात जिल्हा परिषदांमध्ये विविध संवर्गातील १३ हजार ५७० पदे भरण्यात येत आहेत.

ठळक मुद्दे२६ मार्चपासून आॅनलाइन अर्ज भरण्याला सुरूवात झाली असून १६ एप्रिल ही अर्ज भरण्याची अंतीम मुदत आहे. राज्य शासनाच्या नियंत्रणात जिल्हा परिषदांची आॅनलाइन भरती प्रक्रिया प्रथमच होत आहे.राज्यात जिल्हा परिषदांमध्ये विविध संवर्गातील १३ हजार ५७० पदे भरण्यात येत आहेत.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: बहुप्रतीक्षेनंतर निवडणुकांच्या तोंडावर ‘झेडपी’तील पदभरतीचा मुहूर्त निघाल आहे. राज्यात जिल्हा परिषदांमध्ये विविध संवर्गातील १३ हजार ५७० पदे भरण्यात येत आहेत. आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी २६ मार्चपासून सुरूवात झाली असून सुशिक्षीत बेरोजगारांचे लक्ष आता पदभरतीकडे लागले आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ‘मेगा भरती’साठी प्रशासकीय पातळीवरुन हालचाली सुरू होत्या. त्यात विविध पदांसाठी भरती मध्यंतरी घेण्यात आली. परंतू त्यासाठी ठरावीक शैक्षणिक पात्रतेचे उमेदवारच पात्र ठरत होते. त्यामुळे सुशिक्षीत बेरोजगारांनाही जिल्हा परिषदमधून निघणाºया विविध आस्थापनेवरील पदभरतीची प्रतीक्षा लागली होती. लोकसभा निवडणूकीची आदर्श आचार संहिता लागल्यापासून युवकांनीही पदभरतीच्या प्रक्रियेची  आशा सोडून दिली होती. परंतू राज्यातील जिल्हा परिषदमध्ये रिक्त असलेल्या पदांसाठी मोठी भरती काढली आहे. ही सर्व प्रक्रिया आॅनलाईन होत असून त्यासाठी विविध विभागांतील रिक्त जागांची माहिती घेणे, आरक्षणांनुसार पदांची निश्चिती करून त्याचा अहवाल तयार करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून पूर्ण झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी २६ मार्चपासून आॅनलाइन अर्ज भरण्याला सुरूवात झाली असून १६ एप्रिल ही अर्ज भरण्याची अंतीम मुदत आहे. राज्य शासनाच्या नियंत्रणात जिल्हा परिषदांची आॅनलाइन भरती प्रक्रिया प्रथमच होत आहे. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कंत्राटी ग्रामसेवक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), वरिष्ठ सहाय्यक (लिपिक), पर्यवेक्षिका (अंगणवाडी), कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ यांत्रिकी या पदांसाठी ही भरती घेण्यात येत आहे.  जिल्हा परिषद निहाय जागाअहमदनगर ७२९, अकोला २४२, अमरावती ४६३, औरंगाबाद ३६२, बीड ४५६, भंडारा १४३, बुलडाणा ३३२, चंद्रपूर ३२३, धुळे २१९, गडचिरोली ३३५, गोंदिया २५७, हिंगोली १५०, जालना ३२८, जळगाव ६०७, कोल्हापूर ५५२, लातूर २८६, उस्मानाबाद ३२०, मुंबई (उपनगर) ३५, नागपूर ४०५, नांदेड ५५७, नंदुरबार ३३२, नाशिक ६८७, पालघर ७०८, परभणी २५९, पुणे ५९५, रायगड ५१०, रत्नागिरी ४६६, सातारा ७०८, सांगली ४७१, सिंधुदुर्ग १७१, सोलापूर ४१५, ठाणे १९६, वर्धा २६४, वाशिम १८२ आणि यवतमाळ ५०५ जागा आहेत. 

 जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागनिहाय रिक्त पदांची माहिती घेतल्यानंतर ही पदभरती सुरू करण्यात आली आहे. पदभरतीची सर्व प्रक्रिया आॅनलाइन होत असून २६ मार्च ते १६ एप्रिल हा कालावधी उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी देण्यात आला आहे. - राजेश लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाzpजिल्हा परिषदBuldhana ZPबुलढाणा जिल्हा परिषद