शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

वसुली पथकातील अभियंत्यास वीज ग्राहकांची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:59 AM

खामगाव : थकीत बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या येथील विद्युत वितरण  कंपनीच्या पथकातील अभियंत्यास ग्राहकाने मारहाण केल्याची घटना  गुरुवारी सायंकाळी घडली.

ठळक मुद्देगुन्हा दाखल : कर्मचार्‍यांची पोलीस ठाण्यात धडककर्मचार्‍यांनी दाखविले एकीचे बळ!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : थकीत बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या येथील विद्युत वितरण  कंपनीच्या पथकातील अभियंत्यास ग्राहकाने मारहाण केल्याची घटना  गुरुवारी सायंकाळी घडली. यावेळी मारहाणीच्या निषेधार्थ  सुमारे १00  अधिकारी-कर्मचार्‍यांच्या जमावाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धडक  दिली. याप्रकरणी मारहाण करणार्‍या ग्राहकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात  आला असून, महावितरणकडून त्याचा वीज पुरवठा खंडित करण्यात  आला आहे.सध्या महावितरण कंपनीकडून खामगाव शहर व ग्रामीण परिसरात थकीत  विद्युत बिल वसुलीची विशेष धडक मोहीम सुरु आहे. यामध्ये विविध  क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांचे पथक बनवून वसुली  करण्यात येत आहे. दरम्यान, येथील दाळफैल भागातील रहिवाशी राजू  सहारकर या ग्राहकाकडे मार्च २0१६ पासूनचे घरगुती वापराचे १७ हजार  रुपयांचे वीज बिल थकलेले असल्याने गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या  सुमारास हे पथक सहारकर यांच्याकडे गेले. यावेळी सहारकर याने चिडून  जावून पथकातील शहर उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता  राजेश माहुरकर व फरशी वितरण केंद्राचे प्रभारी सहायक अभियंता  पुरुषोत्तम शित्रे यांना दमदाटी करीत शित्रे यांना मारहाण केली. याबाबत  माहिती मिळताच महावितरणचे सुमारे १00 अधिकारी, कर्मचारी एकत्र  येऊन त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला धडक दिली. यावेळी ठाणेदार  संतोष ताले यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. तर पुरुषोत्तम शित्रे यांनी  दिलेल्या तक्रारीवरून राजू सहारकर याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५३,  ३२४, ५0४ अन्वये गुन्हा दाखल  केला. महावितरणच्या पथकाने रात्री      दाळफैलात जावून सहारकर याच्या घरचा विद्युत पुरवठा खंडित केला.  

टॅग्स :mahavitaranमहावितरण