रेती माफियांकडून सव्वा पाच लाख वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 02:12 IST2016-07-13T02:12:20+5:302016-07-13T02:12:20+5:30

सिंदखेडराजा तहसीलची अवैध रेती वाहतूकीवर कारवाई.

Recovery of five lakh recovered from the sand mafia | रेती माफियांकडून सव्वा पाच लाख वसूल

रेती माफियांकडून सव्वा पाच लाख वसूल

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): खडकपूर्णा रेती घाटावरुन रेती वाहतूक करणार्‍या वाहनांची तपासणी ११ जुलै रोजी पथकाचे प्रमुख नायब तहसीलदार एच.डी.वीर यांनी केली. यावेळी टिप्पर क्र .एम.एच.२८ ए.बी.७९२३ मालक शेख अखबर याचा चालक समाधान यांच्या पावत्या तपासण्यात आल्या व त्याच पावतीची घाटावर जाऊन रजिस्टरमध्ये नोंद पाहिली असता सदर पावती रजिस्टर नोंदीवरुन १ जुलै रोजी घेतल्याचे उघड झाले. त्या दिवसापासून त्याच पावतीवर एकचा आकडा टाकून ११ जुलै अशी करण्यात येऊन एकाच पावतीवर दहा दिवस रेती वाहतूक करताना आढळून आला. त्यामुळे या वाहनधारकावर ११ जुलै रोजी अवैध रेती वाहतूकप्रकरणी तीन ब्रास रेतीचा ४७ हजार ४00 रुपये दंड आकारण्यात आला.

Web Title: Recovery of five lakh recovered from the sand mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.