रेती माफियांकडून १७ लाखांचा दंड वसूल
By Admin | Updated: January 31, 2015 00:50 IST2015-01-31T00:50:06+5:302015-01-31T00:50:06+5:30
सिंदखेडराज्या तालुक्यात अवैध रेती उत्खननाची दिड महिन्यात २५0 प्रकरणे.

रेती माफियांकडून १७ लाखांचा दंड वसूल
सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : रेती तस्करीवर अंकुश बसावा म्हणून महसुल विभागाच्या पथकाने अवैध रेती माफियांकडून दीड वर्षात २५0 प्रकरणात १७ लाख रुपये दंड वसूल केला आहे. ज्यांनी रे तीसाठा करून ठेवला आणि दंड भरला नाही, अशा अनेकांच्या सातबार्यावर दंडाचा बोजा चढविण्यात आला आहे. स्थानिक महसूल विभागाच्यावतीने तालुक्यातील हिवरखेड पूर्णा, तडेगाव, राहेरी बु., पिंपळगाव कुडा, लिंगा देवखेड, किनगाव जट्ट या रेतीघाटाचा लिलाव ४ कोटी ४0 लाख रुपयांमध्ये झाला आहे. राहेरी खु. ३१ लाख ३१ हजार ८७0, साठेगाव ५३ लाख २७ हजार ३00, निमगाव वायाळ, टाकरखेड या घाटाचा २९ लाख, ८१ हजार ५00 रुपयात लिलाव झाला आहे.