सातबा-यावर पतीने केली पत्नीच्या नावांची नोंद!

By Admin | Updated: August 2, 2016 01:33 IST2016-08-02T01:33:00+5:302016-08-02T01:33:00+5:30

बुलडाणा येथे महिला महसूल सप्ताहाचे उद्घाटन; शासनाच्या योजनांची माहिती देणार.

Record of wife named wife on Satabah! | सातबा-यावर पतीने केली पत्नीच्या नावांची नोंद!

सातबा-यावर पतीने केली पत्नीच्या नावांची नोंद!

हर्षनंदन वाघ / बुलडाणा
महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन विविध योजना राबवित असून, १ ते ७ ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणार्‍या महसूल सप्ताहाचे उद्घाटन १ ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी करण्यात आले. या महसूल सप्ताहाला बुलडाणा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, लक्ष्मीमुक्ती योजनेंतर्गत तालुक्यातील शिरपूर येथे सातबार्‍यावर पतीने पत्नीच्या नावाच्या मालकी हक्काची पहिली नोंद घेण्यात आली आहे.
शासनातर्फे १ ते ७ ऑगस्ट हा संपूर्ण आठवडा महसूल आठवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. या आठवड्यात महसूल विभाग महिला खातेदारासाठी व्यापक मोहीम राबवित असून, इतर विभागाच्या योजना सोबतच लक्ष्मीमुक्ती योजनेंतर्गत एखाद्या पतीने स्वत:च्या जमिनीत आपल्या कायदेशीर पत्नीच्या नावाने सहहिस्सेदार म्हणून ७/१२ व ८-अ उतारार्‍यावर घेण्यासाठी सहमती दर्शविल्यास अशी नोंद सर्व प्रक्रिया पूर्ण करून तत्काळ येते. अशा प्रकारची नोंद बुलडाणा तालुक्यातील शिरपूर येथे करण्यात आली असून, गट नंबर ५६९ मधील ३.३0 हेक्टर आर जमिनीची नोंद पती प्रल्हाद संतोष सुसर यांनी पत्नी प्रतिभा प्रल्हाद सुसर यांच्या नावाची नोंद ७/१२ व ८-अ उतार्‍यावर सहहिस्सेदार म्हणून घेण्यासाठी फेरफार देऊन सहमती दर्शविली. लवकरच त्यांना ७/१२ देण्यात येणार आहे. याशिवाय तालुक्यातील जॉंब, दहिद बु., भादोला, बुलडाणा, सुंदरखेड आदी ठिकाणी महसूल सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार दीपक बाजड यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजनेचे पत्र, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांसाठी शालेय साहित्याचे वाटप, वारसाचे सातबारा तसेच महिला खातेदारांना सातबाराचे वाटप करण्यात आले.

Web Title: Record of wife named wife on Satabah!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.