नऊ वर्षांपासून विहिरीची नोंद प्रलंबितच!

By Admin | Updated: December 24, 2015 02:41 IST2015-12-24T02:41:04+5:302015-12-24T02:41:04+5:30

लोणार तालुक्यातील प्रकार.

Record of well over nine years! | नऊ वर्षांपासून विहिरीची नोंद प्रलंबितच!

नऊ वर्षांपासून विहिरीची नोंद प्रलंबितच!

लोणार (जि. बुलडाणा): तालुक्यातील गायखेड येथील शेतकरी आश्रू नामदेव घायाळ यांच्या शेतातील विहिरीची नोंद करण्यासाठी २00६ मध्ये त्यांनी संबंधित तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. यावर तहसीलदारांनी विहिरीची नोंद करून घ्यावी, असा आदेशही दिलेला होता. तरीही आदेशाला न जुमानता तलाठी कार्यालयाने तब्बल नऊ वर्षांनंतरही आश्रू नामदेव घायाळ यांच्या सात-बारावर विहिरीची नोंद केलेली नाही. सदर प्रकारची तक्रार घेऊन आश्रू नामदेव घायाळ २३ डिसेंबर रोजी प्रभारी तहसीलदार नितीन पाटील यांच्याकडे गेले असता, त्यांनी संबंधित तलाठी कार्यालयाला याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत तसेच वर्षभरापासून तलाठी कार्यालयाचा कार्यभार पाहणार्‍या तलाठी मीनल खांदे यांनीही विहिरीची नोंद का केली नाही, याबाबत प्रभारी तहसीलदारांनी विचारणा केली व नोंद घेण्याचे आदेश दिले. तथापि, कार्यालयात नेहमीच गैरहजर राहून शेतकर्‍यांची कामे थांबवून नाहक त्रास देणार्‍या तलाठी मीनल खांदे यांच्यावर काय कारवाई होणार, याकडे ग्रामवासीयांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Record of well over nine years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.