मतमोजणी केंद्रास मान्यता

By Admin | Updated: October 11, 2014 23:14 IST2014-10-11T23:14:58+5:302014-10-11T23:14:58+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात मतमोजणी केंद्र निश्‍चित.

Recognition Counting Center | मतमोजणी केंद्रास मान्यता

मतमोजणी केंद्रास मान्यता

बुलडाणा : भारत निवडणूक आयोग तसेच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २0१४ साठी मतदारसंघनिहाय मतमोजणी केंद्रास मंजुरी प्रदान केली आहे. जिल्हाधिकारी तथा बुलडाणा जिल्हा निवडणूक अधिकारी किरण कुरुंदकर यांनी हे कळविले आहे.
विधानसभा मतदारसंघ २१, मलकापूर येथील मतमोजणी केंद्राचे नियोजन कृषिउत्पन्न बाजार समितीच्या गोदाम क्र. २ येथे करण्यात आले आहे. २२ बुलडाणा म तदारसंघाकरिता चिखली रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात, तर २३ चिखलीकरिता तालुका क्रीडा संकुलाचे बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. २४ सिंदखेड राजा मतदारसंघाची मतमोजणी ठिकाण सहकार विद्यामंदिराजवळील जिल्हा मार्केटिंग अधिकारी गोदाम आहे. २५ मेहकरकरिता महाराष्ट्र वेअर हाऊसिंग कापोर्रेशन गोडाऊन नं. ५, डोणगाव रोड येथे मतमोजणी होणार आहे. २६ खामगाव करिता जि. एस. कॉलेज, नांदुरा रोड, खामगाव, तर २७ जळगाव जामोद करिता शासकीय धान्य गोदाम उपविभाग अधिकारी कार्यालयाचे मागे, जळगाव जामोद येथे मतमोजणी होणार आहे.

Web Title: Recognition Counting Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.