धडक सिंचनासाठी ७७ कोटींचे अनुदान प्राप्त
By Admin | Updated: March 3, 2016 02:09 IST2016-03-03T02:09:32+5:302016-03-03T02:09:32+5:30
बुलडाणा जि.प. अध्यक्षांनी घेतला विविध खात्यांचा आढावा.

धडक सिंचनासाठी ७७ कोटींचे अनुदान प्राप्त
बुलडाणा : शेतक-र्यांच्या आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी जिल्हा परिषद विविध योजना राबवित असून, धडक सिंचनासाठी ७७ कोटी अनुदान प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे यांनी दिली.
जिल्हा परिषदमार्फत शासनाच्या विविध योजना राबविल्या जातात. सदर योजनांची स्थिती काय आहे, याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष अलकाताई खंडारे यांनी बुधवारी विविध खात्यांकडून आढावा घेतला. यामध्ये समाजकल्याण विभागाकडे ३ कोटी १५ लाख ५२ हजार रुपये निधी असून, पैकी २ कोटी २२ लाख रुपयांचे ताडपत्री, इलेक्ट्रिक मोटार, पी.व्ही.सी. पाइप आदी साहित्याचे पुरवठा आदेश देण्यात आलेत तसेच कृषी विभागाकडे १ कोटी ३0 लाखांचा निधी असून, ताडपत्री, इलेक्ट्रिक मोटार, पी.व्ही.सी. पाइप पुरवठय़ाचे आदेश देण्यात आलेत. पशुसवंर्धन विभागाकडे दुधाळ जनावरे शेळीगटासाठी ५0 लाख रुपयांची तरतूद असून, शेषमधून कोल कॅबिनेट ५0 लाख व संगणाक खरेदी ४२ लाख रुपयांचे पुरवठा आदेश दिलेत. आरोग्य विभागानेसुद्धा ९३ लाख रुपयांचे साहित्य खरेदीचे पुरवठा आदेश दिल्याचे सांगण्यात आले. टंचाईसाठी अनुदान प्राप्त नसून, धडक सिंचनासाठी ७७ कोटी अनुदान प्राप्त असल्याचे सांगण्यात आले. यासह विविध खात्यांचा आढावासुद्धा यावेळी घेण्यात आला. वरिष्ठांसोबत मुजोरीने वागणार्या कर्मचार्यांवर कारवाई होत नाही, याबाबत मात्र नाराजी व्यक्त करण्यात आली.