वाचन प्रेरणा दिनाची लागली उत्सुकता
By Admin | Updated: October 15, 2015 00:35 IST2015-10-15T00:35:48+5:302015-10-15T00:35:48+5:30
एपीजे अब्दुल कलाम जयंतीनिमित्त शाळांमध्ये पुस्तक प्रदर्शन.

वाचन प्रेरणा दिनाची लागली उत्सुकता
युसूफ शेख / संग्रामपूर (जि. बुलडाणा) : मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची १५ ऑक्टोबर ही जयंती. वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाणार आहे. त्यानुषंगाने विद्यार्थ्यांंंसह पालक वर्गामध्ये सध्या त्याविषयी उत्सुकता लागली आहे. थोडक्यात ह्यवाचू आनंदेह्ण ही संकल्पना घेऊन हा दिवस साजरा होत आहे.
गुरुवारी विद्यार्थी दप्तराविना शाळेत येणार असून, व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांंंना वाचनाची आवड लागावी, हा दृष्टिकोण या दिनामागे आहे. सोबच प्रकट वाचनाला १५ ऑक्टोबरला महत्त्व देण्यात येणार असून, वाचनादरम्यान विद्यार्थ्यांंंमध्ये दिसून येणार्या त्रुटींच्या नोंदी घेण्यात येतील. विद्यार्थ्यांंंमध्ये वाचनकला विकसित होण्यासाठीही प्रयत्न होणार आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांना २८ सप्टेंबर रोजी यासंदर्भात परिपत्रक पाठविण्यात आले आहे. त्यात माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुषंगाने तालुक्यातील शाळांनी तयारी केली आहे. सोबतच या ह्यवाचू आनंदेह्ण दिनाच्या अनुषंगाने पालकांनाही यामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे.
अवांतर पुस्तक वाचनावर भर
इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांंंंना शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त बोधपर, प्रेरणादायी पुस्तके या दिवशी वाचण्यासाठी देण्यात येणार आहेत. कला, नाट्य, सिनेमा, साहित्य, विज्ञान, क्रीडाविषयक पुस्तकांचा यात समावेश राहणार आहे. पुस्तकांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. जगातील प्रसिद्ध लेखकांचीही ओळख विद्यार्थ्यांंंना करून देण्यात येणार आहे.