शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

शासनाच्या कल्याणकारी योजना सर्वत्र पोहचवा - प्रतापराव जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:57 PM

बुलडाणा: सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. शासनाच्या या कल्याणकारी योजना सर्वत्र पोहचवा, असे आवाहन खासदर प्रतापराव जाधव यांनी केले.

ठळक मुद्देनेहरू युवा केंद्राद्वारे जिल्हास्तरीय युवा संमेलन सांस्कृतिक कार्यक्रमात युवकांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. शासनाच्या या कल्याणकारी योजना सर्वत्र पोहचवा, असे आवाहन खासदर प्रतापराव जाधव यांनी केले. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र बुलडाणाद्वारा  जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित जिल्हास्तरीय युवा संमेलन, युवाकृती व जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष उमा तायडे, तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जालिंधर बुधवत, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक हरिहर जिराफे, प्रा. हरीश साखरे, प्रा. अविनाश गेडाम, अजयसिंग राजपूत हे उपस्थित होते.  प्रास्ताविक नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक हरिहर जिराफे यांनी केले. राष्ट्रीय युवा नेता कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे विमोचन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सत्यमेव जयते शिक्षण व बहूद्देशीय संस्था, महिमळ ता. चिखली यांना वर्ष २0१७-१८ चा जिल्हा युवा पुरस्कार रुपये २५ हजार,  स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र  मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे सचिव  नितेश थिगळे यांच्यासह संस्थेतील पदाधिकार्‍यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच नगर परिषद मेहकरद्वारा स्वच्छता दूत म्हणून निवड करण्यात आलेले नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक सागर कडभने, जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे पहिले बक्षीस  पटकविणार्‍या शीतल विष्णू खण्ड हिला रुपये ५00 स्मृतिचिन्ह देऊन या दोघांचा सन्मान करण्यात आले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. 

टॅग्स :Prataprao Jadhavप्रतावराव जाधवbuldhanaबुलडाणा