जीवन प्राधिकरण कर्मचा-यांचे रजा आंदोलन

By Admin | Updated: December 5, 2015 09:09 IST2015-12-05T09:09:00+5:302015-12-05T09:09:00+5:30

जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी काळय़ा फिती लावून एक दिवशीय सामूहिक रजा आंदोलन केले.

The Raza Movement of the Life Authority employee | जीवन प्राधिकरण कर्मचा-यांचे रजा आंदोलन

जीवन प्राधिकरण कर्मचा-यांचे रजा आंदोलन

बुलडाणा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे व अधिकारी व कर्मचार्‍यांचे वेतन, भत्ते व नवृत्ती वेतन शासनाच्यावतीने अदा करण्यात यावे, या मागण्यांसाठी ४ डिसेंबर रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी काळय़ा फिती लावून एक दिवशीय सामूहिक रजा आंदोलन केले. या आंदोलनामुळे बुलडाणा, चिखली, खामगाव व जळगाव जामोद येथील कार्यालयात एकच शुकशुकाट पसरला आहे.
सामूहिक रजा आंदोलन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता व्ही.एम. सरकटे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनात बुलडाणा विभागासह चिखली, खामगाव व जळगाव जामोद उपविभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी कर्मचार्‍यांच्या वतीने जिल्हािधकार्‍यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यामध्ये नमूद केले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून जात आहे. या विभागाकडे कामाचा व्याप कमी झाल्याने उत्पन्नाचा स्त्रोतदेखील कमी झाला आहे. परिणामी, आज जीवन प्राधिकरणाजवळ कर्मचार्‍यांना मासिक वेतन देण्यासाठीसुद्धा निधी नाही. त्यामुळे भविष्यात कर्मचार्‍यांना वेतन व भत्ते मिळणे अशक्यप्राय होणार आहे. जीवन प्राधिकरणाला शासकीय सेवेत समाविष्ट करण्यासाठी अनेक संघटनांनी आजपयर्ंत आंदोलने केली; परंतु त्या आंदोलनाची शासनाने कुठलीच दखल घेतली नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांची हेळसांड थांबवावी, या विभागाला शासकीय सेवेत सामावून घेत अधिकारी व कर्मचार्‍यांचे वेतन, भत्ते व नवृत्ती वेतन शासनाच्यावतीने अदा करण्यात यावे, या मागणीसाठी अधिकारी व कर्मचार्‍यांनी काळय़ा फिती लावून एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन केले.

Web Title: The Raza Movement of the Life Authority employee