मारहाणप्रकरणी एकास सहा महिने सश्रम कारावास
By Admin | Updated: October 15, 2015 00:39 IST2015-10-15T00:39:48+5:302015-10-15T00:39:48+5:30
खामगाव न्यायालयाचा निकाल; २0११ मधील मारहाणप्रकरण.
_ns.jpg)
मारहाणप्रकरणी एकास सहा महिने सश्रम कारावास
खामगाव : शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याप्रकरणी सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल बुधवारी खामगाव न्यायालयाने दिला.
तालुक्यातील बोरी अडगाव येथील भरत विश्राम सुरवाडे (४२) यांची पत्नी १८ डिसेंबर २0११ रोजी घराची सफाई करीत असताना , त्यांची वहिनी नंदाबाई हिने भरतला शिवीगाळ केली. तिला समजावून सांगण्यास गेले असता, मोठा भाऊ प्रल्हाद सुरवाडे याच्यासमवेत तिने शिवीगाळ व मारहाण केली व जखमी केले, अशी तक्रार भरत सुरवाडे यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला १९ डिसेंबर रोजी दिली होती. या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी प्रल्हाद विश्राम सुरवाडे (४८) व नंदाबाई सुरवाडे (४0) या दाम्प्त्याविरोधात भादंविच्या कलम ३२५, ५0४, ३४ नुसार गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
याप्रकरणी पाच साथीदार तपासण्यात आले. सरकारी अभियोक्ता अजय इंगळे व साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून प्रल्हाद सुरवाडे यास कलम ३२५ मध्ये सहा महिने सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम भरत सुरवाडेला नुकसानभरपाई म्हणून द्यावी तसेच दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने शिक्षा देण्याचे निकालात नमूद आहे. या प्रकरणातील नंदाबाई प्रल्हाद सुरवाडे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली.