महिलेवर बलात्काराचा प्रयत्न
By Admin | Updated: May 11, 2015 02:09 IST2015-05-11T02:09:33+5:302015-05-11T02:09:33+5:30
जळगाव जामोद येथील घटना.

महिलेवर बलात्काराचा प्रयत्न
जळगाव जामोद : महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना आकोला खुर्द ता. जळगाव जामोद येथे ९ मे रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आकोला खुर्द येथील महिलेने याबाबत दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, घरात एकटी असल्याचे पाहून गावातीलच भागवत राजाराम बोंद्रे याने घरात घुसून महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने आरडाओरड केली असता महिलेचा सासरा व सासू घरी आल्याने भागवत बोंद्रे पळून गेला. या आशयाच्या फिर्यादीवरुन जळगाव जा. पोलिसांनी भागवत बोंद्रे याच्याविरुध्द कलम ३७६ (१) ४५२ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मुपडे व सहकारी करीत आहेत.