रानडुकरांची शिकार !

By Admin | Updated: January 12, 2015 23:14 IST2015-01-12T23:14:46+5:302015-01-12T23:14:46+5:30

सोनाळा परिसरातील वनक्षेत्रात राणडुकरांची शिकारीच्या वाढत्या घटना; वन्यजीव विभागाचे दुर्लक्ष.

Randukar hunting! | रानडुकरांची शिकार !

रानडुकरांची शिकार !

सोनाळा (बुलडाणा) : परिसरातील वनक्षेत्रात गेल्या काही दिवसांमध्ये शेकडो रानडुकरांची कत्तक झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, याकडे वन्यजीव विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.
सोनाळा आणि सगोडा परिसरात गेल्या काही महिन्यांमध्ये जवळपास शंभरावर रानडुकरांची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. परिसरात रानडुकरांच्या मासाची तस्करी करणार्‍या टोळी सक्रीय झाल्या आहेत. या टोळी सोनाळा येथून जवळच असलेल्या बोरखेड, सगोडा टुनकी वसाली परिसरात अवैध शिकार करतात. शिकारीसाठी सायंकाळी अंधाराचा फायदा घेतल्या जात असून रानडुकरांचा वावर असलेल्या भागात जमिनीच्या आत बारुदचे फटाके लावल्या जातात. या बारुदी फटाक्यांना खाद्यपदार्थाचे वेसन लावले असते. रात्रीच्या वेळी रानडुकर खाद्यपदार्थ शोधत जमिन उकरत राहते. दरम्यान, स्पंज बारुदचा स्फोट होवून डुकर हे जखमी अथवा जबडा फाटून ते मृत्यूमुखी देखील पडते. रानडुकराच्या मासाला मोठी किंमत असल्यामुळे शिकारी टोळींनी रानडुक्कर या वन्यजीवाला लक्ष्य केले आहे.
रानडुकरासोबतच घोरपड, हरिण, रोही या प्राण्यांचीही शिकार वाढली आहे. उल्लेखनिय म्हणजे दिवसाढवळ्या शिकारी टोळी वन्यजीवांची शिकार करीत आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यात वन्यजीव विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या शिकार्‍यांचे मनोबल उंचावले असून वन्यजीवांची शिकार करणे त्यांचा नित्यक्रम झाला आहे. सोनाळा ते टुनकी रोडलगतच वनविभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयात मोठय़ाप्रमाणात कर्मचारी देखील आहेत. मात्र, त्यांच्या डोळ्यादेखत वन्यजीवाची शिकार पोत्यात टाकून नेल्या जाते.
त्यामुळे या सर्व प्रकाराला सर्वस्वी वनकर्मचारीच जबाबदार असल्याची ओरड परिसरातील वन्यजीव प्रेमींकडून होत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरट्या पध्दतीने शिकार होत आहे. याकडे वनविभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी वन्यजीव प्रेमीकडून होत आहे.

Web Title: Randukar hunting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.