रामपालांचा सत्संग अंगलट!
By Admin | Updated: November 22, 2014 01:33 IST2014-11-22T01:33:07+5:302014-11-22T01:33:07+5:30
खामगावातील तीन भाविकांपैकी एक जण अद्याप परतलेच नाही.

रामपालांचा सत्संग अंगलट!
खामगाव (बुलडाणा): स्वयंभू आध्यात्मिक गुरू संत रामपाल महाराज यांच्या स त्संगाला जाणे, पहुरजीरा येथील भाविकांना चांगलेच महागात पडल्याची चर्चा आहे. सत्संगाला गेलेले काही भाविक शुक्रवारपर्यंत घरी पोहोचले आहेत. मात्र, यापैकी एक भाविक अद्यापही पोहोचला नसल्याने चिंतेचे वातावरण आहे.
हरियाणाच्या हिस्सार जिल्ह्यातील बरवाला नगर येथे संत रामपाल महाराज यांचा सतपाल आश्रम आहे. या आश्रमात त्यांचे देश-विदेशातील भाविक सत्संगाला जातात. शेगाव तालुक्यातील पहुरजीरा येथे रामपाल महाराजांचे ३0-४0 भाविक आहेत. यापैकी बहुतांश भाविक आश्रमाच्या निमंत्रणावरून बरवाला येथील स तलोक आश्रमात सत्संगात गेले होते. त्यापैकी महादेव झांबरे आणि बद्री वाघोडे १४ नोव्हेंबर रोजी घरी परतले. तर श्याम पागृत, पुंजाजी पारस्कर हे गुरूवारी मध्यरात्री परत आले. मात्र, गावातील श्रीराम झाडोकार हे अद्यापपर्यंत पोहोचले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे गावात चिंता व्यक्त होत आहे. पंजाब उच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून पोलिसांशी दोन हात करण्याचा प्रयत्न बाबा रामपाल यांनी आपल्या सर्मथकांच्या बळावर केला. अटक टाळण्याठी बाबा रामपालने आपल्या हजारो अनुयायांना सतपाल आश्रमात बोलाविले होते. यामध्ये शेगाव तालुक्यातील पहुरजीरा येथील भाविकांसह तब्बल दहा हजार भाविक आश्रमात पोहोचले. पोलिसांनी बाबा रामपाल यांना अटक करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिस आणि सर्मथक यांच्यामध्ये घुमश्चक्री झाल्याने तणाव वाढला. दरम्यान, पहुरजीरा येथील भाविकांना पोलिसांनी रेल्वे स्थानका पर्यंत आणून सोडले. या भाविकांसोबतच कुणाला बस स्थानक तर रेल्वे स् थानकापर्यंत आणण्यात आले. यावेळी प्रचंड तणाव निर्माण झाल्यामुळे पहुरजीरा येथील भाविकांची फाटाफूट झाली. यापैकी दोघे घरी परतले मात्र यातील श्रीराम झाडोकार हे अद्याप घरी पोहोचले नाहीत. ते सुध्दा घरी पोहोचतील मात्र सद्यातरी ते आले नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.
*पहिल्यांदाच सत्संगाला जाणारे पागृत भयभीत
पहुरजीरा येथील श्याम पागृत हे पहिल्यांदाच सतलोक आश्रमात सत्संगाला गेले होते.आश्रमाचा पहिलाच प्रवास अतिशय खडतर झाल्यामुळे ते भयभीत झाले. तर गावातील श्रीराम झाडोकार अद्यापही परतले नाहीत. प्राप्त माहितीनुसार ते परतीच्या मार्गावर असल्याचे समजते. मात्र, गावातील दोन भाविक परतल्यानंरही झाडोकार अद्याप न परतल्याने त्यांचे कुटुंबियांमध्ये चिंतेचे सावट आहे.