खामगाव तालुक्यात पावसाचा फटका!

By Admin | Updated: July 27, 2016 00:08 IST2016-07-27T00:08:21+5:302016-07-27T00:08:21+5:30

अतिवृष्टीची नोंद; शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली.

Rampage in Khamgaon taluka! | खामगाव तालुक्यात पावसाचा फटका!

खामगाव तालुक्यात पावसाचा फटका!

खामगाव : तालुक्यात दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली आहेत. नदी-नाल्याला आलेल्या पुरामुळे अनेक क्षेत्रात पाणी साचलेले आहेत. खामगाव तालुक्यात मंगळवारी अतवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात आल्याने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत दिली जाणार आहे. खामगाव तालुक्यात दमदार पाऊस होत असल्याने पीकपरिस्थिती समाधानकारक आहे. मागील आठवडा पूर्णत: पावसाअभावी कोरडा आहे. शेती मशागतीची कामे दरम्यानच्या काळात आटोपती झाली व पुन्हा शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. सोमवार रात्रीपासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला एकदम धो-धो पाऊस बरसल्याने नदी नाल्यांना पूर आले. खामगाव-मेहकर रोडवरील आवार गावाजवळील पुलावरून वाहत असल्याने सकाळी ८ वाजताच्या सुमारास दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. पुलावरून पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. तालुक्यातील हिवरखेड, उमरा, अटाळी, गणेशपूर, आवार या भागात शेतात पाणी शिरल्याने पिके अक्षरश: पाण्याखाली आली. यामुळे ऐन जोमात असलेली पिके नासाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेती पिकाचे होणारे नुकसान पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यातील माक्ता व कोक्ता या दोन गावांमध्ये जाण्याकरिता असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने येथील संपर्क काही काळासाठी बंद होता.

Web Title: Rampage in Khamgaon taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.