सारशिव सरपंचपदी रमाबाई जाधव, उपसरपंचपदी संजाब ढोणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:32 IST2021-02-14T04:32:24+5:302021-02-14T04:32:24+5:30

सरपंच व उपसरपंच पदासाठी एक एक अर्ज असल्याने अविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायत सभागृहामध्ये गुरुवारी निवड प्रक्रिया ...

Ramabai Jadhav as Sarshiv Sarpanch, Sanjab Dhone as Deputy Sarpanch | सारशिव सरपंचपदी रमाबाई जाधव, उपसरपंचपदी संजाब ढोणे

सारशिव सरपंचपदी रमाबाई जाधव, उपसरपंचपदी संजाब ढोणे

सरपंच व उपसरपंच पदासाठी एक एक अर्ज असल्याने अविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायत सभागृहामध्ये गुरुवारी निवड प्रक्रिया पार पडली. सरपंच व उपसरपंच पदासाठी एक एक अर्ज असल्याने सरपंचपदी रमाबाई दादाराव जाधव तर उपसरपंचपदी संजाबराव ढोणे पाटील यांची अविरोध निवड झाली. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी गणेश महाजन, ग्रामसेवक गजानन मवाळ यांनी कामकाज पार पडले. यावेळी सीमा संजाब ढोणे, सुजाता नितीन जाधव, स्वप्नील एकनाथ जाधव, गोपाल मोहरुत, गणेश ढोणे, शाम ढोणे, शेखर पाटील, मदन आ. ढोणे, राजेश कान्हे, राहुल ढोणे, सुनील कान्हे, सतीश द.ढोणे, पी.के.शेजुळ, रंगराव जाधव, नारायण जाधव, गजानन जाधव, दीपक जाधव उपस्थित होते.(वा. प्र.)

Web Title: Ramabai Jadhav as Sarshiv Sarpanch, Sanjab Dhone as Deputy Sarpanch