सावित्री-जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त रॅली
By Admin | Updated: January 4, 2016 02:33 IST2016-01-04T02:33:03+5:302016-01-04T02:33:03+5:30
मोताळा येथे रॅलीतून दिला शेतकरी आत्महत्यामुक्तीचा संदेश.

सावित्री-जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त रॅली
मोताळा (जि. बुलडाणा) : साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक, शेतकरी व दलितांच्या हत्या थांबल्याच पाहिजेत, असा संदेश देत बोराखेडी येथे के.बी.जे. नॉलेज हब विद्यालयातर्फे सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवानिमित्त ३ जानेवारी रोजी रॅली काढण्यात आली. सरपंच सुरेश गर्दे, प्राचार्य डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दिली. बोराखेडी येथील के.बी.जे. विद्यालयात दरवर्षी जिजाऊ-सावित्री दशरात्रौत्सव विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून उत्साहात साजरा केला जातो. यादरम्यान कुसुमावती जाधव राज्य साहित्य पुरस्काराचे वितरणही केले जाते. दरवर्षी रॅलीच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देऊन प्रबोधन केले जाते. यावर्षीसुद्धा मोताळय़ात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. समाजामध्ये होत असलेल्या साहित्यिक, दलित, समाजसुधारक, शेतकरी यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. त्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे, असा संदेश देण्यासाठी यावर्षी रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीदरम्यान ढोल-ताशांसह लेझीमच्या निनादात हातामध्ये विविध संदेश देणारी फलके सर्वांंच्या आकर्षणाचे केंद्र बनले होते.