रॅली, फटाके अन ढोल-ताशांचा गजर!
By Admin | Updated: July 9, 2016 00:31 IST2016-07-09T00:31:00+5:302016-07-09T00:31:00+5:30
भाऊसाहेबांच्या मंत्रिपदी निवडीमुळे सर्वत्र उत्साह; गावागावांत जल्लोष.

रॅली, फटाके अन ढोल-ताशांचा गजर!
बुलडाणा/खामगाव : संपूर्ण जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क असलेले पांडुरंग फुंडकर यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यामुळे ठिकठिकाणी रॅली काढून, फटाके फोडून तसेच ढोल- ताशांचा गजर करून आनंद साजरा करण्यात आला.
जिल्ह्याची राज्यात मागास जिल्हा म्हणून ओळख आहे. स्वतंत्र महाराष्ट्र निर्मितीपासून अद्यापपर्यंत बुलडाणा जिल्ह्यात घाटाखाली कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळाले नाही. मात्र भाऊसाहेब फुंडकर यांच्या रूपाने प्रथमच क ॅबिनेट मंत्रिपद जिल्ह्यात घाटाखाली मिळाल्याने खामगाव शहरात शुक्रवारी दिवाळी साजरी झाली. राज्य मंत्रिमंडळाचा शुक्रवारी विस्तार होऊन विधान परिषदेचे आमदार भाऊसाहेब फुंडकर यांचीही कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाली. यानंतर दिवसभर खामगाव शहरातील चौकाचौकांत, प्रत्येक वार्डात आ तषबाजी करण्यात आली. तसेच ढोल-ताशांच्या निनादात डीजेवर मिरवणुका काढण्यात आल्या. भाऊसाहेबांचा शपथविधी पाहता यावा, यासाठी शहरातील गांधी चौकात मोठय़ा स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली होती. खामगाव मतदारसंघातील गावागावांत उत्साही कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. भाऊसाहेबांची मंत्रिपदी वर्णी लागणार हे गुरुवारीच निश्चित झाल्याचे माहिती मिळाल्यानंतर गुरुवारपासूनच शहरात आतषबाजीला सुरुवात झाली होती. शहरा तील भाजपा कार्यालयावर विद्युत रोषणाईसुद्धा करण्यात आली आहे. भाऊसाहेब फुंडकर यांना मंत्रिपद मिळाल्याने गुरुवारपासून सुरु झालेला हा जल्लोष आणखी काही दिवस साजरा होणार आहे. भाऊसाहेब फुंडकर यांचे मुंबई येथून आगमन झाल्यानंतर ठिकठिकाणी भाऊसाहेब फुंडकर यांच्या सत्काराचे तसेच तुलेचे आयोजनाची तयारीसुद्धा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
भाजपातील ज्येष्ठ नेत्याचा पक्षनेतृत्वाने मंत्रिपद देऊन सन्मान केल्याची तसेच भाऊसाहेबांमुळे मतदारसंघातील विकासाला चालना मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.