खामगावच्या बाजारपेठेत राजस्थानच्या पणत्या
By Admin | Updated: October 16, 2014 23:26 IST2014-10-16T23:26:23+5:302014-10-16T23:26:23+5:30
आधुनिक युगात मातीच्या पणत्यांची क्रेझ कायम.

खामगावच्या बाजारपेठेत राजस्थानच्या पणत्या
खामगाव (बुलडाणा): दीपावलीनिमित्त नानाविध प्रकारच्या असंख्य पणत्या बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. यंदा प्रामुख्याने राजस्थान राज्यातील जोधपूर, जयपूर, पि पाड येथून खास गाळाच्या मातीच्या पणत्या खामगावात विक्रीसाठी दाखल झाल्या असल्या तरी, स्थानिक पणत्यांनाच अधिक मागणी आहे.
दीपावलीच्या दिवशी पहाटे आणि सायंकाळच्या सुमारास प्रत्येक घरासमोर पणत्यांचा शीतल प्रकाश असतोच. शहरातील मुख्य रस्त्यावरील शहर पोलिस स्टेशन परिसरात नानाविध प्रकारातील असंख्य पणत्या विक्रीस उपलब्ध आहेत. येथे बहुतांशी विक्रेते हे राजस्थानातील जयपूर येथीलच आहेत. त्याचबरोबरीने स्थानिक शिवाजी वेस, टिळक मैदान भागातील कुभांरांकडे मातीच्या पणत्यांची विक्री सुरु आहे. प्रामुख्याने पारंपरिक मातीच्या पणत्यांनाच नागरिकांची अधिक मागणी आहे. या पणत्या २५ ते ३0 रुपये डझन या दराने उपलब्ध आहे त. बदलत्या जमान्यानुसार आणि ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन मातीच्या पणत्यांना आकर्षक रंगात रंगविण्यात येत आहे. देशातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सांगली-माधवनगर रस्त्यावर आकर्षक आकाराच्या पणत्या खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे.