बीबी परिसरात पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST2021-09-23T04:39:33+5:302021-09-23T04:39:33+5:30

गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरूच असल्यामुळे काढणीला आलेले शेतकऱ्याचे सोयाबीनचे पीक हे खराब होण्याच्या मार्गावर आहे, तर कपाशी पिकाची ...

Rainstorm in BB area | बीबी परिसरात पावसाचा कहर

बीबी परिसरात पावसाचा कहर

गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरूच असल्यामुळे काढणीला आलेले शेतकऱ्याचे सोयाबीनचे पीक हे खराब होण्याच्या मार्गावर आहे, तर कपाशी पिकाची बोंड, कैऱ्या या पावसामुळे सडून खराब होऊन काळे पडत असल्यामुळे शेतकरी हतबल होताना दिसून येत आहेत. कोरोनातून सुटका होत नाही, तोच निसर्गाचे संकट शेतकऱ्यांवर येत असल्यामुळे लागवडीसाठी घेतलेले सावकाराकडून कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला असून मूग, उडीद पिके तर गेलीच. मात्र, आता हातातोंडाशी आलेला सोयाबीन, कपाशी पिकाचा घाससुद्धा पाऊस हिरावून घेत असल्याचे चित्र दिसत आहे. आधीच शेतकऱ्यांजवळ सोयाबीन पीक काढण्यासाठी पैसे नसून मजुरीचे दरही तीन हजार रुपयांच्या वर एकराप्रमाणे भाव मजूर सांगत आहेत. मात्र, पावसामुळे तोही देण्याचे कठीण झाले असून, पदरात उत्पन्न किती मिळते याचीही चिंता शेतकऱ्याला लागली असून, शासनाकडून मदतीची अपेक्षा शेतकरी करीत आहेत.

Web Title: Rainstorm in BB area