पावसामुळे सोयाबिनची आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 13:42 IST2020-10-17T13:42:32+5:302020-10-17T13:42:55+5:30
खामगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत ८ ते १० हजार क्विंटल सोयाबिनची आवक आहे.

पावसामुळे सोयाबिनची आवक घटली
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : जिल्ह्यात सर्वात मोठे पीक असलेल्या सोयाबिनला पावसामुळे मोठा फटका बसला असून बाजार समितीतील आवकही घटली आहे. दरवर्षी खामगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत आॅक्टोबर महिन्यात २० हजार क्विंटल आवक होते. यावर्षी सध्या ८ ते १० हजार क्विंटलच आवक होत आहे.
सध्या जिल्ह्यात आठ दिवसांपासून परतीचा पाऊस बरसत आहे. त्यामुळे सोयाबिन भिजले आहे. तसेच वातावरणातही ओलावा असल्याने सोयाबिनमध्ये आद्रता वाढली आहे. त्यामुळे बाजार समितीत सोयाबिनला कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांनी सोंगणी केलेले सोयाबिन सध्या विकण्याऐवजी घरात साठवूण ठेवण्याला प्राधान्य देत आहे. सध्या खामगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत ८ ते १० हजार क्विंटल सोयाबिनची आवक आहे. दरवर्षी ही आवक २० हजार क्विंटल एवढी असते.
दरवर्षीच्या तुलनेत दहा ते बारा हजार क्विंटल कमी आवक होत आहे. सध्या ज्या शेतकºयांकडे साठवूण ठेवण्याची सोय नाही व पैशांची नितांत गरज आहे. तेच शेतकरी सोयाबिन विक्रीला आणत आहेत. सध्या सोयाबिनला ३८०० ते चार हजार रूपये भाव मिळत आहे.