पावसाने धाड परिसरामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:21 IST2021-07-23T04:21:34+5:302021-07-23T04:21:34+5:30
पाणी शेतांमध्ये शिरल्याने पिकांचे तसेच शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. लोणार तालुक्यातील धाड, टिटवी, गंधारी, शिवनी जाट व इतर सर्व ...

पावसाने धाड परिसरामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान
पाणी शेतांमध्ये शिरल्याने पिकांचे तसेच शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. लोणार तालुक्यातील धाड, टिटवी, गंधारी, शिवनी जाट व इतर सर्व भागांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू असून, बुधवारी (दि. २१) दिवसभर व रात्री पावसाची १०२ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. लोणार तालुक्यात आजपर्यंत एकूण ५३६ मि.मी. पाऊस झाला आहे. तालुक्यातील इतर महसूल मंडळांमध्ये अनेक शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टर जमिनीचे पिकांचे नुकसान झाले आहे. धाड परिसरामध्ये कपाशी, तूर, सोयाबीन व इतर पिकांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. धाड परिसरामध्ये वनविभागाने केलेल्या माती बंधारे व लघुपाटबंधारे विभागांतर्गत झालेल्या बंधारे वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे. जोरदार पावसामुळे शिवणी जाट, गंधारी, लघुपाटबंधारे विभागाचे अंतर्गत येणारे सिंचन तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाले आहे. शेतात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर शिरल्याने कपाशीसह, मूग सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. असाच जर पाऊस दोन-तीन दिवस राहिला तर पिके शेतकऱ्यांच्या हातून जातील, अशी भीती निर्माण झाली आहे़ सतत पडणाऱ्या पावसामुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
लघुपाटबंधारे विभाग सिंचन तलाव परिस्थिती
टिटवी धरण : ७०.३९ टक्के, गंधारी १०० टक्के, पिंपळणेर ७२.९०, शिवणी जाट १००, तांबोला ५३.३५, देऊळगाव कुंडपाळ ७३.९६, गुंधा ६८.८७ टक्के जलसाठा आहे.