मेहकर तालुक्यात वादळासह पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:26 IST2021-06-02T04:26:23+5:302021-06-02T04:26:23+5:30
तालुक्यातील लावणा या गावात वादळी वाऱ्यामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये जिजाबा कुंडलिक ढगे यांची २० टिनपत्रे, सोयाबीनची ...

मेहकर तालुक्यात वादळासह पाऊस
तालुक्यातील लावणा या गावात वादळी वाऱ्यामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये जिजाबा कुंडलिक ढगे यांची २० टिनपत्रे, सोयाबीनची ९ पोती, तूर ५ पोती, हरभरा ४ पोती व घरगुती इतर सामान असे एकूण एक लाख ४९ हजार रुपयांचे तर लक्ष्मण राघोजी जयपुरे यांचे चाळीस हजार रुपये, गणपत त्र्यंबक मानवतकर यांचे २ हजार रुपये, ज्ञानेश्वर सोपान अंभोरे यांचे दहा हजार रुपये, देवीदास रामभाऊ पवार यांचे दहा हजार रुपये, सुखदेव माणिक अवताडे यांचे बारा हजार रुपये या प्रकारे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा सरपंच भारत बाबूराव बोबडे, पोलीस पाटील देवानंद परमानंद ढगे, विलास ढगे यांच्यासमक्ष तलाठी यांनी केला आहे.